शेतकरी संरक्षण कायदा मसुद्यावर अण्णा हजारे यांच्याशी अभ्यासपूर्ण चर्चा; शासन दरबारी पाठपुराव्याचे आश्वासन
टाकळीभान प्रतिनिधी : Anna Hazare यांची राळेगण सिद्धी येथे Ajit Kale यांनी भेट घेऊन “शेतकरी संरक्षण कायदा मसुदा” या विषयावर सविस्तर व अभ्यासपूर्ण चर्चा केली. यावेळी काळे यांनी शेतकऱ्यांच्या विविध प्रश्नांवर आपले मुद्दे मांडत हा मसुदा शासनाकडे पाठवून त्यासाठी प्रभावी पाठपुरावा करण्याची विनंती केली.
या चर्चेदरम्यान शेतकऱ्यांना हमीभाव, रात्रीच्या वेळी पाणी भरण्याच्या अडचणी, वन्य प्राण्यांपासून पिकांचे संरक्षण तसेच कृषी मालाच्या मार्केटिंगसंदर्भातील प्रश्नांवर सखोल विचारविनिमय करण्यात आला. अण्णा हजारे यांनी सर्व मुद्दे गांभीर्याने ऐकून घेत शेतकरी संरक्षण कायदा अत्यंत महत्त्वाचा असल्याचे मत व्यक्त केले. तसेच या कायद्याबाबत जनजागृती आणि शासन दरबारी पाठपुरावा करण्यासाठी प्रयत्न करण्यात येतील, असे त्यांनी सांगितले.
यावेळी कांदा उत्पादक शेतकऱ्यांची बिकट परिस्थिती आणि मालाला मिळणारा अत्यल्प दर याबाबतही Ajit Kale यांनी अण्णा हजारे यांच्यासमोर प्रश्न मांडला. या विषयावरही सकारात्मक विचार करण्यात येईल, असे अण्णांनी स्पष्ट केले.
शेतकरी संरक्षण कायदा मसुदा तयार करण्यासाठी Mukundrao Gaikwad, Ashok Dhage आणि अशोक सब्बन यांनी विशेष प्रयत्न केले. तसेच या कायद्याविषयी त्यांनी आपले अभ्यासपूर्ण विचार मांडले.
याप्रसंगी प्रा. कार्लस साठे, प्रभारी व प्रवक्ते शेतकरी संघटना अहिल्यानगर यांनी सध्याच्या शेतकऱ्यांची आर्थिक अधोगती आणि परिस्थितीवर भाष्य केले. बैठकीस साहेबराव चोरमल, पोपटराव साठे, कर्नाटक राज्य शेतकरी संघटनेचे अध्यक्ष Dayanand Patil, श्री मंजुनाथ तसेच प्रवरा संगमचे उपसरपंच नितीन भालेराव उपस्थित होते.
पत्रकार : दिलीप लोखंडे, श्रीरामपूर











