ईदच्या दिवशी सारसबाग गणपती मंदिर बंद; सरकारच्या धोरणाविरोधात हिंदू महासभा आक्रमक
पुणे :
ईदच्या दिवशी पुण्यातील प्रसिद्ध सारसबाग गणपती मंदिर काही काळ बंद ठेवण्यात आल्याच्या पार्श्वभूमीवर हिंदुत्ववादी संघटना आणि हिंदू महासभेकडून तीव्र संताप व्यक्त करण्यात आला. “हिंदूंनी नेहमीच घाबरून राहायचे का? देशात प्रथमच अशी वेळ आली आहे,” असा सवाल करत कार्यकर्त्यांनी प्रशासनाच्या भूमिकेवर टीका केली.
या प्रकरणानंतर हिंदू महासभेचे पदाधिकारी आनंद दवे तसेच कार्यकर्त्यांनी सारसबाग येथे जाऊन मंदिर दर्शनासठी उघडले,.मंदिर बंद ठेवण्याचा निर्णय चुकीचा असून त्यामुळे हिंदू भावनांचा अपमान झाल्याचा आरोप यावेळी करण्यात आला.
आनंद दवे यांनी प्रसारमाध्यमांशी बोलताना सांगितले की, धार्मिक स्थळांबाबत प्रशासनाने समान धोरण ठेवले पाहिजे. “एखाद्या सणाच्या पार्श्वभूमीवर हिंदू मंदिर बंद ठेवणे योग्य नाही. प्रशासनाने दबावाखाली निर्णय घेऊ नयेत,” असे त्यांनी म्हटले.
दरम्यान, या घटनेनंतर परिसरात काही काळ तणावाचे वातावरण निर्माण झाले होते. पोलिसांनी परिस्थिती नियंत्रणात ठेवण्यासाठी बंदोबस्त वाढवला होता.
या घटनेमुळे शहरात धार्मिक आणि राजकीय वर्तुळात चर्चेला उधाण आले असून, हिंदुत्ववादी संघटनांनी यापुढे अशा निर्णयांना तीव्र विरोध करण्याचा इशारा दिला आहे.
पत्रकार उमेश कुलकर्णी
9822548429










