स्वगणना प्रक्रियेला आजपासून सुरुवात; नागरिकांना ऑनलाइन सहभागाचे आवाहन


स्वगणना प्रक्रियेला आजपासून सुरुवात; नागरिकांना ऑनलाइन सहभागाचे आवाहन

भारत सरकारच्या जनगणना प्रक्रियेअंतर्गत सेल्फ इन्यूमरेशन (स्वगणना) उपक्रमाला आजपासून सुरुवात झाली आहे. नागरिकांना https://se.census.gov.in⁠� या अधिकृत संकेतस्थळावर जाऊन स्वतःची माहिती ऑनलाइन भरता येणार आहे. ही प्रक्रिया पूर्ण करण्यासाठी अवघे तीन ते चार मिनिटे लागत असून घरबसल्या सहज नोंदणी करता येत आहे.
स्वगणना करताना नागरिकांनी आपली लोकेशन अचूकपणे टॅग करणे आवश्यक असून नोंदणी पूर्ण झाल्यानंतर मिळणारा SE ID सुरक्षित जतन करून ठेवण्याचे आवाहन करण्यात आले आहे. भविष्यातील पडताळणी आणि संदर्भासाठी हा आयडी महत्त्वाचा ठरणार आहे.
सरकारच्या या डिजिटल उपक्रमामुळे जनगणना प्रक्रिया अधिक सुलभ, जलद आणि पारदर्शक होणार असून सर्व नागरिकांनी सक्रिय सहभाग नोंदवून सहकार्य करावे, असे आवाहन प्रशासनाकडून करण्यात आले आहे.

प्रतिनिधी सिंथिया कोरिया मुंबई


26
कृपया वोट करा

लोक1 न्यूजच्या बातम्याबद्दल मत व्यक्त करा

हे देखील पहा...

error: Content is protected !!