नर्सिंग शिक्षणाला बळकटी; १० नवीन महाविद्यालयांना मान्यता


नर्सिंग शिक्षणाला बळकटी; १० नवीन महाविद्यालयांना मान्यता

मुंबई : राज्यातील नर्सिंग शिक्षणाचा विस्तार करण्यासाठी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या निर्देशानुसार महत्त्वपूर्ण निर्णय घेण्यात आला आहे. राज्यात ८ जी.एन.एम. महाविद्यालयांचे श्रेणीवर्धन, ५ बी.एस्सी. नर्सिंग महाविद्यालयांची प्रवेश क्षमता ५० वरून १०० आणि १० नवीन शासकीय नर्सिंग महाविद्यालये सुरू करण्यास मान्यता देण्यात आली आहे. या निर्णयासाठी एकूण ५५८.७१ कोटी रुपयांच्या खर्चास मंजुरी देण्यात आली असून, प्रशिक्षित परिचारिकांची संख्या वाढण्यास मदत होणार आहे.

प्रतिनिधी उमेश कुलकर्णी


64
कृपया वोट करा

लोक1 न्यूजच्या बातम्याबद्दल मत व्यक्त करा

error: Content is protected !!