पुण्यात आरपीआय नेत्याची निघृण हत्या, एकट्याला गाठून धारदार शस्त्राने केले वार.


पुण्यात आरपीआय नेत्याची निघृण हत्या, एकट्याला गाठून धारदार शस्त्राने केले वार

पिंपरी चिंचवड प्रतिनिधी: पुण्याच्या पिंपरी-चिंचवडमधील मोशी येथे आरपीआय (आठवले गट) कामगार आघाडीचे प्रदेशाध्यक्ष अनिल मोरे यांची अज्ञात हल्लेखोरांनी धारदार शस्त्राने हत्या केली. ही घटना सोमवारी रात्री ‘युवराज रेस्टॉरंट अँड बार’ या ठिकाणी घडली. हत्येचे कारण अद्याप अस्पष्ट आहे. या घटनेमुळे शहरात तणाव असून आरोपींना अटक करेपर्यंत मृतदेह ताब्यात न घेण्याचा पवित्रा कार्यकर्त्यांनी घेतला आहे.

प्रतिनिधी: शाम शिरसाठ पुणे.


26
कृपया वोट करा

लोक1 न्यूजच्या बातम्याबद्दल मत व्यक्त करा

error: Content is protected !!