​अकरावी ऑनलाइन प्रवेशासाठी २५ मे पर्यंत मुदतवाढ; तांत्रिक अडचणींमुळे बोर्डाचा निर्णय


​अकरावी ऑनलाइन प्रवेशासाठी २५ मे पर्यंत मुदतवाढ; तांत्रिक अडचणींमुळे बोर्डाचा निर्णय

​पुणे: शैक्षणिक वर्ष २०२६-२७ मधील अकरावी प्रवेशासाठी ऑनलाइन नोंदणी करणाऱ्या विद्यार्थ्यांसाठी एक महत्त्वाची बातमी आहे. शिक्षण संचालनालयाने ऑनलाइन नोंदणीच्या पहिल्या फेरीसाठी आता २५ मे २०२६ रोजी संध्याकाळी ६ वाजेपर्यंत मुदतवाढ दिली आहे.
​तांत्रिक बिघाडामुळे घेतला निर्णय
गेल्या दोन दिवसांपासून प्रवेश प्रक्रियेच्या अधिकृत संकेतस्थळावर पालकांनी आणि विद्यार्थ्यांनी मोठ्या संख्येने लॉगिन केले होते. यामुळे सर्व्हरवर प्रचंड ताण येऊन तो डाऊन झाला होता. सर्व्हर डाऊन झाल्यामुळे अर्ज भरताना अनेक तांत्रिक अडचणी येत होत्या, ज्याचा मोठा मनस्ताप विद्यार्थ्यांना आणि पालकांना सहन करावा लागला.

या तांत्रिक तक्रारींची दखल घेत बोर्डाने अखेर ३ दिवसांची मुदतवाढ देण्याचा निर्णय घेतला आहे. या मुदतवाढीमुळे ज्या विद्यार्थ्यांचे अर्ज अद्याप अपूर्ण आहेत किंवा ज्यांना तांत्रिक कारणामुळे नोंदणी करता आली नाही, त्यांना आता मोठा दिलासा मिळाला आहे. उर्वरित विद्यार्थ्यांनी २५ मे च्या मुदतीपूर्वी आपले अर्ज सादर करावेत, असे आवाहन करण्यात आले आहे.

​पत्रकार उमेश कुलकर्णी
९८२२५४८४२९


26
कृपया वोट करा

लोक1 न्यूजच्या बातम्याबद्दल मत व्यक्त करा

हे देखील पहा...

error: Content is protected !!