​मनोज जरांगे पाटील यांचे उपोषण सुटले: मध्यरात्रीच्या चर्चेनंतर सरकारकडून मागण्या मान्य


​मनोज जरांगे पाटील यांचे उपोषण सुटले: मध्यरात्रीच्या चर्चेनंतर सरकारकडून मागण्या मान्य

​जालना:मराठा आरक्षणाच्या मागणीसाठी जालना जिल्ह्यातील अंतरवाली सराटी येथे उपोषणाला बसलेले मनोज जरांगे पाटील यांनी अखेर आपले उपोषण मागे घेतले आहे. झालेल्या महत्त्वपूर्ण राजकीय घडामोडींनंतर हा निर्णय घेण्यात आला.

राज्य सरकारच्या वतीने मंत्री राधाकृष्ण विखे पाटील आणि आमदार प्रसाद लाड यांनी मध्यरात्री जरांगे पाटील यांची भेट घेतली. यावेळी प्रदीर्घ चर्चा झाली असून सरकारने जरांगे पाटील यांच्या सर्व मागण्या पूर्ण करण्याचे आश्वासन दिले. या आश्वासनानंतर जरांगे पाटील यांनी उपोषण सोडण्याचा निर्णय घेतला.
​मराठा समाज झाला होता आक्रमक
रखरखत्या उन्हात शेतात बाज टाकून सुरू असलेल्या या उपोषणामुळे मराठा समाज मोठ्या प्रमाणावर आक्रमक झाला होता. राज्यात ठिकठिकाणी पडसाद उमटत असल्याने राजकीय हालचालींना वेग आला होता. अखेर सरकारच्या मध्यस्थीमुळे आणि मागण्या मान्य झाल्याने अंतरवाली सराटी येथील तणाव निवळला असून आंदोलकांनी समाधान व्यक्त केले आहे.

पत्रकार उमेश कुलकर्णी
9822548429


26
कृपया वोट करा

लोक1 न्यूजच्या बातम्याबद्दल मत व्यक्त करा

हे देखील पहा...

error: Content is protected !!