भोसरीचा उड्डाणपूल पाडू नका, अतिरिक्त भूसंपादनही नको – महापौर रवि लांडगे यांची ठाम भूमिका


भोसरीचा उड्डाणपूल पाडू नका, अतिरिक्त भूसंपादनही नको – महापौर रवि लांडगे यांची ठाम भूमिका

भोसरी परिसरातील नागरिकांच्या हिताशी संबंधित महत्त्वाच्या विषयांवर महापौर रवि लांडगे यांनी राष्ट्रीय महामार्ग प्राधिकरणाच्या अधिकाऱ्यांसोबत झालेल्या बैठकीत ठाम भूमिका मांडली. महामार्ग NHAI चे प्रकल्प संचालक संजय कदम यांच्यासोबत झालेल्या बैठकीत भोसरी येथील विद्यमान उड्डाणपूल कोणत्याही परिस्थितीत पाडण्यात येऊ नये तसेच भोसरी गावठाण परिसरात अतिरिक्त भूसंपादन करण्यात येऊ नये, अशी स्पष्ट मागणी करण्यात आली.
महापौर रवि लांडगे यांनी विकासकामांच्या नावाखाली स्थानिक नागरिक, व्यापारी आणि रहिवाशांवर अन्याय होऊ नये, यासाठी प्रशासनाने संवेदनशील भूमिका घेण्याची गरज व्यक्त केली. भोसरी गावठाणातील नागरिकांच्या भावना, स्थानिक व्यापारावर होणारा परिणाम आणि वाहतूक व्यवस्थेची गरज यांचा सविस्तर आढावा घेत विकास आणि नागरिकहित यामध्ये समतोल राखणे आवश्यक असल्याचे त्यांनी बैठकीत नमूद केले.
यावेळी NHAI चे प्रकल्प संचालक संजय कदम यांनी महापौरांनी मांडलेल्या सर्व मुद्द्यांची सकारात्मक दखल घेत आवश्यक कामांना प्राधान्य देण्यात येईल तसेच भोसरीकरांच्या हिताच्या दृष्टीने मांडलेल्या सूचनांवर तातडीने कार्यवाही करण्यात येईल, असे आश्वासन दिले.
भोसरीच्या विकासाबरोबरच नागरिकांचे हक्क आणि स्थानिक हितसंबंध जपण्यासाठी आपण कटिबद्ध असल्याचे महापौर रवि लांडगे यांनी यावेळी स्पष्ट केले.
प्रतिनिधी विजय अडसूळ


26
कृपया वोट करा

लोक1 न्यूजच्या बातम्याबद्दल मत व्यक्त करा

हे देखील पहा...

error: Content is protected !!