ऐकावे ते नवलच,गरोदर नसताना महिलेला प्रसुतीसाठी पाठवले घाटीत:-
जि. छ. संभाजीनगर:दि. 16 जून :-ऐकावे ते नवलच अशी वेळ सर्वसामान्यांवर आली आहे. विज्ञानाची ऐसी की तैसी गरोदरपणाची पुर्ण प्रक्रिया राबवूनही प्रसुती वेळेस तपासणी नंतर सदर महिला गरोदर नसल्याचे समोर आले. यामुळे सर्वांनाच मोठा धक्का बसला आहे. परिणामी सावंगी आरोग्य केंद्रात एकच राडा झाला असून हा विषय चर्चेचा ठरत आहे.
अधिक माहिती अशी की,बाजार सावंगी गावातीलच नवविवाहितेला दिवस गेले म्हणून आरोग्य केंद्रा अंतर्गत सात-आठ महीने गरोदर आरोग्य प्रक्रिया राबविण्यात आली. ८ जून रोजी त्रास होत असल्याने त्यांना बाजार सावंगी प्राथमिक आरोग्य केंद्रात नेले. प्रसुती प्रथमच असल्याने केंद्रातून घाटीसाठी ‘रेफर’ करण्यात आले. परंतु घाटीत नेल्यानंतर नवविवाहिताला दोन तीन दिवस प्रसुतीसाठीच्या कळा निघत नाही, प्रसुतीचे कुठलेच लक्षण दिसून येत नसल्याने घाटी रुग्णालय प्रशासन विभागाने प्राथमिक आरोग्य केंद्र -सोनोग्राफी केल्यावर पोटात बाळ नसल्याचे समोर आल्याने एकच खळबळ उडाली.
दरम्यान, ही बात गेल्या सात ते आठ महिन्यांपासून आरोग्य कर्मचाऱ्यांच्या लक्षात का आली नाही? त्यात त्यांनी रूग्णही रेफर केले ही बाब गंभीर असल्याचे समोर आले आहे. याबद्दल नागरिकांतून आश्चर्य व्यक्त करण्यात येत आहे. या घोडचुकीचा नवविवाहितेच्या नातेवाईकांना मोठा मनस्ताप सोसावा लागला आहे.याबाबत जाब विचारण्यासाठी आरोग्य केंद्रात नातेवाईक व काही पदाधिकारी सामाजिक कार्यकर्ते पोहचले असता त्यांचे तेथे समाधान न झाल्याने ते संतापले.
यावेळी राष्ट्रवादी काँग्रेसचे आदिनाथ साळुंके यांनी या प्रकरणी आरोग्य विभागाच्या जिल्हा वरिष्ठ अधिकाऱ्यांसी संपर्क करुन कारवाई करण्याची मागणी केली.
पत्रकार : विजय रणभोर, पुणे.
9359280220.










