कोळी मल्हार बांधवांना जातीचे दाखले मिळावेत; हिंदू महासभेचे रायगड जिल्हाधिकाऱ्यांना निवेदन


कोळी मल्हार बांधवांना जातीचे दाखले मिळावेत; हिंदू महासभेचे रायगड जिल्हाधिकाऱ्यांना निवेदन

अलिबाग (प्रतिनिधी): रायगड जिल्ह्यातील कोळी मल्हार समाजातील बांधवांना जातीचे दाखले मिळण्यात येणाऱ्या अडचणी दूर करून त्यांना न्याय द्यावा, या मागणीसाठी अखिल भारत हिंदू महासभेच्या वतीने रायगड जिल्हाधिकाऱ्यांना निवेदन देण्यात आले. जिल्हाधिकाऱ्यांच्या अनुपस्थितीत निवासी जिल्हाधिकारी संदेश शिर्के यांनी हे निवेदन स्वीकारले.
हिंदू महासभेच्या म्हणण्यानुसार, रायगड जिल्ह्यातील विविध तालुक्यांमध्ये कोळी मल्हार समाजाचे सुमारे पाच हजार सभासद आहेत. मासेमारी हा प्रमुख व्यवसाय असलेल्या या समाजातील सुमारे ९० टक्के नागरिक आजही जातीच्या दाखल्यांपासून वंचित आहेत. त्यामुळे त्यांना शासकीय योजना, शैक्षणिक सवलती तसेच आरक्षणाच्या लाभांपासून दूर राहावे लागत असल्याचे निवेदनात नमूद करण्यात आले आहे.
कोळी मल्हार समाजातील नागरिकांना जातीचे दाखले मिळावेत यासाठी कर्जत, खालापूर आणि सुधागड-पाली तालुक्यातील तहसील कार्यालयांमध्ये अर्ज करण्यात आले होते. मात्र, दिले जाणारे दाखले जात पडताळणी प्रक्रियेत टिकत नसल्याचे सांगत संबंधित तहसीलदारांनी हा विषय जिल्हाधिकारी स्तरावर मांडण्याचा सल्ला दिला होता.
या पार्श्वभूमीवर प्रशासनाने सकारात्मक भूमिका घेत तातडीने योग्य तो निर्णय करावा आणि कोळी मल्हार समाजातील गरजू आदिवासी बांधवांना कायदेशीर जातीचे दाखले उपलब्ध करून द्यावेत, अशी मागणी हिंदू महासभेने केली आहे.
निवेदन देताना महिला प्रदेश समन्वयक अदिती जोशी, प्रदेश पदाधिकारी अजित जोशी, रायगड जिल्हाध्यक्ष मधुकर खामकर, जिल्हा संघटक मिलिंद भोईर, सागर दीक्षित यांच्यासह हिंदू महासभेचे २५ हून अधिक कार्यकर्ते उपस्थित होते.

पत्रकार :उमेश कुलकर्णी
9822548429


26
कृपया वोट करा

लोक1 न्यूजच्या बातम्याबद्दल मत व्यक्त करा

हे देखील पहा...

error: Content is protected !!