नारगोली येथे एसटी बस व ईर्टिगा कारची धडक; परीक्षेसाठी निघालेल्या विद्यार्थ्यांचा थोडक्यात बचाव:-


नारगोली येथे एसटी बस व ईर्टिगा कारची धडक; परीक्षेसाठी निघालेल्या विद्यार्थ्यांचा थोडक्यात बचाव:-

जि. रत्नागिरी, ता. दापोली:दि. 18 जून :-दापोली-खेड मार्गावरील नारगोली परिसरात गुरुवारी सकाळी महाराष्ट्र राज्य परिवहन महामंडळाच्या (एसटी) बस आणि ईर्टिगा कार यांच्यात भीषण अपघात झाला. या अपघातात कारचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले असून वाहनातील काही जण किरकोळ जखमी झाले आहेत. सुदैवाने कोणतीही जीवितहानी झाली नसल्याने मोठा अनर्थ टळला.

मिळालेल्या माहितीनुसार, दापोलीहून खेड येथील विधी महाविद्यालयात परीक्षा देण्यासाठी विद्यार्थ्यांची ईर्टिगा कार (क्र. MH-08-BE-0072) जात होती. नारगोली परिसरात पोहोचताच समोरून येणाऱ्या एसटी बसची (क्र. MH-BT-2441) कारला जोरदार धडक बसली. संबंधित एसटी बस खेडहून दापोलीच्या दिशेने येत होती.

या धडकेत एर्टिगा कारच्या पुढील भागाचे मोठे नुकसान झाले आहे.कारमधील प्रवाशांना किरकोळ दुखापत झाली असून त्यांना प्रथमोपचार देण्यात आले. गंभीर दुखापत झाली नसल्याने नागरिकांनी सुटकेचा निश्वास सोडला.

दरम्यान, संबंधित यंत्रणांकडून पुढील कार्यवाही सुरू असून अपघाताचे नेमके कारण काय होते, याचा तपास केला जात आहे.

पत्रकार : विजय रणभोर, पुणे.
9359280220.


26
कृपया वोट करा

लोक1 न्यूजच्या बातम्याबद्दल मत व्यक्त करा

हे देखील पहा...

error: Content is protected !!