महापालिका बरखास्त करून ग्रामपंचायत स्थापन करा, घरपट्टी वाढिच्या विरोधात विविध संघटनांचा एल्गार :-


महापालिका बरखास्त करून ग्रामपंचायत स्थापन करा, घरपट्टी वाढिच्या विरोधात विविध संघटनांचा एल्गार :-

सांगली:दि. 17 जून :- सांगली, मिरज आणि कुपवाड महापालिकेने मूल्यांकनाच्या नावाखाली घरपट्टीत तिप्पटपेक्षा अधिक वाढ केल्याच्या निर्णयाविरोधात वंचित बहुजन माथाडी ट्रान्सपोर्ट व जनरल कामगार युनियनने तीव्र आक्रमक भूमिका घेतली आहे. वाढीव घरपट्टीचा निर्णय तात्काळ रद्द करावा, अन्यथा महापालिका बरखास्त करून ग्रामपंचायत स्थापन करण्यासाठी व्यापक जनआंदोलन छेडण्याचा इशारा संघटनेने दिला आहे.

संघटनेच्या पदाधिकाऱ्यांनी पत्रकार परिषदेत सांगितले की, वाढत्या महागाईमुळे सर्वसामान्य नागरिक आधीच आर्थिक अडचणीत सापडले आहेत. अशा परिस्थितीत महापालिकेने घरपट्टीत मोठी वाढ करून जनतेवर अन्याय केला आहे. नागरिकांना मूलभूत सुविधा देण्यात प्रशासन अपयशी ठरत असताना करवाढ लादणे म्हणजे जनतेच्या जखमेवर मीठ चोळण्यासारखे असल्याची टीकाही करण्यात आली.

शहरातील रस्ते, गटारे, पाणीपुरवठा आणि स्वच्छतेच्या सुविधांची दयनीय अवस्था असतानाही करवाढ करण्यात आल्याचा आरोप संघटनेने केला. तसेच मूल्यांकन प्रक्रियेत पारदर्शकता नसल्याचा आणि नागरिकांच्या हरकतींकडे दुर्लक्ष झाल्याचाही दावा करण्यात आला. या प्रश्नावर लोकप्रतिनिधींनी मौन बाळगल्यामुळे त्यांनीही प्रशासनाला अप्रत्यक्ष पाठबळ दिल्याचा आरोप संघटनेने केला.

“जनतेला सुविधा नाहीत, मात्र कर तिप्पट वाढवले जात आहेत. हा सरळसरळ अन्याय असून वाढीव घरपट्टीचा निर्णय तातडीने मागे घ्यावा,” अशी मागणी संघटनेने केली. निर्णय रद्द न झाल्यास न्यायालयीन लढ्यासह तीव्र जनआंदोलन उभारण्यात येईल, असा इशाराही देण्यात आला.

यावेळी पश्चिम महाराष्ट्र महासचिव प्रशांत वाघमारे, जिल्हा संपर्कप्रमुख संजय भूपाल कांबळे, जिल्हाध्यक्ष संजय संपत कांबळे, कार्याध्यक्ष जगदीश कांबळे, महासचिव अनिल मोरे यांच्यासह संघटनेचे पदाधिकारी आणि कार्यकर्ते उपस्थित होते. “अन्यायकारक घरपट्टी वाढ रद्द होईपर्यंत जनतेसाठीचा लढा सुरूच राहील,” असा निर्धार संघटनेने व्यक्त केला.

पत्रकार :विजय रणभोर, पुणे.
9359280220.


26
कृपया वोट करा

लोक1 न्यूजच्या बातम्याबद्दल मत व्यक्त करा

हे देखील पहा...

error: Content is protected !!