महापालिकेच्या भोंगळ कारभारावर मंगेश चव्हाण यांची घणाघाती टीका :-


महापालिकेच्या भोंगळ कारभारावर मंगेश चव्हाण यांची घणाघाती टीका :-

सांगली:दि. 17 जून :-सांगली, मिरज आणि कुपवाड महापालिकेच्या जन्म-मृत्यू नोंदणी विभागात हजारो दाखले प्रलंबित असल्याने विद्यार्थी आणि नागरिकांना मोठ्या अडचणींचा सामना करावा लागत असल्याचा आरोप विरोधी पक्षनेते मंगेश चव्हाण यांनी केला आहे. मिरज विभागात सुमारे १,५८०, तर सांगली विभागात २,२०८जन्म-मृत्यू दाखले प्रलंबित असल्याचे त्यांनी सांगितले.

दाखले वेळेत उपलब्ध होत नसल्यामुळे अनेक विद्यार्थ्यांचे शाळा व महाविद्यालयातील प्रवेश रखडले आहेत. अशा गंभीर परिस्थितीत नागरिकांचे प्रश्न सोडवण्याऐवजी महापालिकेतील सत्ताधारी निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर गोवा दौऱ्यात व्यस्त असल्याची टीका चव्हाण यांनी केली.

“सत्ता ही भोगण्यासाठी नसून जनतेचे प्रश्न सोडवण्यासाठी असते. हजारो नागरिक आणि विद्यार्थ्यांचे प्रश्न प्रलंबित असताना सत्ताधाऱ्यांनी गोवा दौरा करणे ही जनतेची थट्टा आहे,” असा घणाघात त्यांनी केला.

तसेच, “स्वतःकडे बहुमत असल्याचा दावा करणाऱ्या सत्ताधाऱ्यांना नगरसेवकांवर विश्वास नसेल तरच त्यांना गोव्याला घेऊन जाण्याची वेळ आली आहे,” असा टोला लगावत नागरिकांचे प्रश्न तातडीने सोडवण्याची मागणी त्यांनी केली.

पत्रकार :विजय रणभोर, पुणे.
9359280220.


52
कृपया वोट करा

लोक1 न्यूजच्या बातम्याबद्दल मत व्यक्त करा

error: Content is protected !!