मुंबईत बेस्ट कर्मचाऱ्यांचा बेमुदत संप; बससेवा कोलमडली, लाखो प्रवाशांचे हाल


मुंबईत बेस्ट कर्मचाऱ्यांचा बेमुदत संप; बससेवा कोलमडली, लाखो प्रवाशांचे हाल

मुंबई : बेस्ट कर्मचाऱ्यांनी आजपासून बेमुदत संप सुरू केल्याने मुंबईची सार्वजनिक वाहतूक व्यवस्था विस्कळीत झाली आहे. कर्मचारी संघटनांच्या आंदोलनामुळे शहरातील बससेवेला मोठा फटका बसला असून सकाळपासूनच प्रवाशांची गैरसोय होत आहे. संपामुळे बेस्टच्या बससेवा आणि काही ठिकाणी वीजपुरवठ्यावरही परिणाम होण्याची शक्यता व्यक्त करण्यात आली आहे.
मिळालेल्या माहितीनुसार, हजारो बसांपैकी अत्यल्प बस रस्त्यावर धावत असल्याने रेल्वे स्थानके, बसथांबे आणि प्रमुख चौकांमध्ये प्रवाशांची मोठी गर्दी झाली. नोकरदार, विद्यार्थी आणि सर्वसामान्य नागरिकांना प्रवासासाठी रिक्षा व टॅक्सीचा आधार घ्यावा लागत असून अनेक ठिकाणी लांबच लांब रांगा लागल्याचे चित्र दिसत आहे.
बेस्ट संयुक्त कामगार कृती समितीने वेतन, निवृत्तीवेतन, कर्मचारी भरती, थकीत देयके आणि बेस्टच्या भवितव्याशी संबंधित विविध मागण्यांसाठी हा संप पुकारला आहे. प्रशासन आणि संघटनांमधील चर्चा निष्फळ ठरल्यानंतर कर्मचाऱ्यांनी आंदोलनाचा मार्ग स्वीकारला.
संप किती दिवस चालणार याबाबत अद्याप स्पष्टता नसली तरी मुंबईकरांच्या दैनंदिन जीवनावर त्याचा मोठा परिणाम होत असून प्रशासनासमोर सेवा सुरळीत करण्याचे आव्हान उभे ठाकले आहे.

पत्रकार उमेश कुलकर्णी
9822548429


26
कृपया वोट करा

लोक1 न्यूजच्या बातम्याबद्दल मत व्यक्त करा

हे देखील पहा...

error: Content is protected !!