श्रीरामपुरात अंमली पदार्थ पकडला २.५ लाखाचा मुद्देमाल जप्त
टाकळीभान प्रतिनिधी-श्रीरामपूर येथे विक्री करण्यासाठी बेकायदेशिरपणे अंमली पदार्थ एमडी (मेफेड्रोन) आणलेल्या दोघांना अंमली पदार्थासह पकडले असून त्यांच्याकडून अडीच लाखांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे.
याबाबतची अधिक माहिती | अशी की, वॉर्ड नं.१ मधील एकजण अंमली पदार्थ विकण्यासाठी तो अंमली पदार्थ संगमनेरच्या दिशेने जात असल्याची माहिती पोलिसांना कळाली. त्यानंतर पोलिसांनी श्रीरामपूर-संगमनेर रोडवर असणाऱ्या अस्तगाव फाटा येथे मिळालेल्या माहितीनुसार जावून त्या ठिकाणी पांढऱ्या रंगाच्या मोपेड मोटारसायकलवर एकजण बसलेला दिसला. तेव्हा पोलिसांनी त्याला थांबवून त्याची झडती घेतली असता त्याच्याकडे पांढऱ्या प्लॅस्टिकच्या पिशवीत एमडी (मेफेड्रोन) नावाचा अंमली पदार्थ किमत रूपये ९६ हजार ६०० आढळून आला. पोलिसांनी ५० हजार रूपयांचा मोबाईल, ६ हजार २०० रूपयांची रोकड आणि १ लाखाची विनानंबरची मोपेडअसा २ लाख ५२ हजार ८०० रूपयांचा मुद्देमाल जप्त करत सोहेल जुबेर शेख, वय-२७, रा. मिल्लतनगर, वॉर्ड नं.२, श्रीरामपूर आणि आसिफ मुनीर शेख, रा. बेलापूर, ता. श्रीरामपूर (फरार) या दोघांविरूद्ध श्रीरामपूर शहर पोलिसात गुन्हा दाखल केला आहे. पुढील तपास श्रीरामपूर शहर पोलीस करीत आहेत.
प्रतिनिधी: दिलीप लोखंडे श्रीरामपूर






