माजी खासदार विनायक राऊत यांना मोठा झटका; न्यायालयाने फेटाळला अंतरिम जामीन


माजी खासदार विनायक राऊत यांना मोठा झटका; न्यायालयाने फेटाळला अंतरिम जामीन

ठाणे:शिवसेना (UBT) पक्षाचे नेते आणि माजी खासदार विनायक राऊत तसेच त्यांचा मुलगा गीतेश राऊत यांना ठाणे न्यायालयाने मोठा झटका दिला आहे. न्यायालयाने दोघांचाही अंतरिम जामीन अर्ज फेटाळून लावला आहे.
सून गिरीजा राऊत यांनी दाखल केलेल्या कौटुंबिक छळ आणि जादूटोणा विरोधी गुन्ह्याप्रकरणी हा निर्णय देण्यात आला आहे. या प्रकरणात राऊत पिता-पुत्रांनी अंतरिम दिलासा मिळावा म्हणून न्यायालयात अर्ज केला होता.
महत्त्वाचे मुद्दे:
गिरीजा राऊत यांनी दाखल केलेल्या कौटुंबिक छळ आणि जादूटोणा विरोधी गुन्ह्याप्रकरणी जामीन अर्ज करण्यात आला होता.
ठाणे न्यायालयाने विनायक राऊत आणि गीतेश राऊत या दोघांचाही अंतरिम जामीन अर्ज फेटाळला आहे.
मुख्य जामीन अर्जावर अद्याप अंतिम निर्णय येणे बाकी आहे.
अंतरिम दिलासा नाकारल्यामुळे कापूरबावडी पोलिसांकडून कोणत्याही क्षणी अटक होण्याची शक्यता वर्तवली जात आहे.

प्रतिनिधी उमेश कुलकर्णी
9822548429


47
कृपया वोट करा

लोक1 न्यूजच्या बातम्याबद्दल मत व्यक्त करा

error: Content is protected !!