मिटी नदीजवळ मृतदेह सापडल्याने साकीनाक्यात खळबळ मुंबई | प्रतिनिधी


मिटी नदीजवळ मृतदेह सापडल्याने साकीनाक्यात खळबळ

मुंबई | प्रतिनिधी सिंथिया कोरिया
मुंबईतील साकीनाका परिसरात मिटी नदीजवळील गटारात एका व्यक्तीचा मृतदेह आढळून आल्याची धक्कादायक घटना समोर आली आहे. ही घटना डोनाल्ड (Donald) परिसराच्या जवळ घडल्याची प्राथमिक माहिती मिळाली आहे.
घटनेची माहिती मिळताच साकीनाका पोलिसांनी तातडीने घटनास्थळी धाव घेतली. पोलिसांनी मृतदेह ताब्यात घेऊन शवविच्छेदनासाठी पाठवला असून पुढील तपास सुरू केला आहे.
मृत व्यक्तीची ओळख अद्याप पटलेली नाही. तसेच मृत्यू नेमका कशामुळे झाला, हा अपघात, आत्महत्या की घातपात, याबाबत कोणतीही अधिकृत माहिती अद्याप समोर आलेली नाही. पोलिस सर्व शक्यतांचा तपास करत आहेत.
या प्रकरणाबाबत अधिकृत माहिती मिळाल्यानंतरच मृत्यूचे नेमके कारण स्पष्ट होणार असून, पोलिसांकडून पुढील तपास सुरू आहे.


47
कृपया वोट करा

लोक1 न्यूजच्या बातम्याबद्दल मत व्यक्त करा

error: Content is protected !!