स्व. राजेंद्रजी श्रीवास्तव वरिष्ठ महाविद्यालयात एम.एस.डब्ल्यू.सह विविध अभ्यासक्रमांच्या प्रवेशास सुरुवात; रोजगाराभिमुख शिक्षणावर भर
पारध, प्रतिनिधी : कवि कुलगुरू कालिदास संस्कृत विद्यापीठ, रामटेक संलग्न व महाराष्ट्र शासन मान्यताप्राप्त स्व. राजेंद्रजी श्रीवास्तव वरिष्ठ महाविद्यालय, पारध (ता. भोकरदन, जि. जालना) येथे शैक्षणिक वर्ष २०२६-२७ साठी विविध पदवी व पदव्युत्तर अभ्यासक्रमांच्या प्रवेश प्रक्रियेला सुरुवात झाली असल्याची माहिती महाविद्यालयाचे सचिव विक्रांत श्रीवास्तव (भाईजी) यांनी दिली.
महाविद्यालयात बी.ए. (Civil Services), बी.बी.ए., बी.कॉम., एम.ए. (Public Administration), एम.एस.डब्ल्यू. (Master of Social Work) तसेच डी.लिब. (एक वर्षीय अभ्यासक्रम) या अभ्यासक्रमांसाठी प्रवेश सुरू असून, बारावी उत्तीर्ण कला, वाणिज्य व विज्ञान शाखेतील विद्यार्थ्यांना प्रवेशाची संधी उपलब्ध आहे.
विशेष म्हणजे एम.एस.डब्ल्यू. (Master of Social Work) अभ्यासक्रमासाठी कोणत्याही शाखेतील पदवीधर विद्यार्थ्यांना प्रवेश घेता येणार असून अभ्यासक्रमाचा कालावधी दोन वर्षांचा आहे. या अभ्यासक्रमामुळे प्रकल्प समन्वयक, जिल्हा सल्लागार, समाज कल्याण अधिकारी, क्षेत्रीय अधिकारी, आदिवासी कल्याण अधिकारी, महिला व बालविकास विभाग तसेच वसतिगृह अधीक्षक/गृहपाल अशा विविध क्षेत्रांत रोजगाराच्या संधी उपलब्ध होत असल्याचे विक्रांत श्रीवास्तव यांनी सांगितले.
महाविद्यालयात सर्व कॅटेगरीतील विद्यार्थ्यांसाठी भारत सरकारच्या शिष्यवृत्ती योजनांचा लाभ, तसेच महाविद्यालयातच परीक्षा केंद्राची सुविधा उपलब्ध आहे. त्यामुळे ग्रामीण भागातील विद्यार्थ्यांना दर्जेदार व रोजगाराभिमुख शिक्षणाची संधी मिळत आहे.
प्रवेशासाठी इच्छुक विद्यार्थ्यांनी आवश्यक कागदपत्रांसह त्वरित महाविद्यालयाशी संपर्क साधावा, असे आवाहन करण्यात आले आहे.
संपर्क:
विक्रांत श्रीवास्तव (भाईजी) – ९७६७४७१३०९
मो. ९४२२७२४३९९
प्रतिनिधी महेंद्र बेराड






