ॲड. अजित काळे साहेब यांची तबीयत चिंताजनक

टाकळीभान प्रतिनिधी-आकारी पडीत शेतकरी यांचे हक्काच्या जमिनीच्या मालकीहक्का बद्दल आदरणीय उच्च न्यायालय औरंगाबाद खंडपीठाने दोन वर्षांपूर्वी आकारी पडीत शेतकऱ्यांच्या बाजूने निर्णय दिलेला असून सुद्धा शासनाने अजून पर्यंत आकारी पडीत शेतकरी अल्पभूधारक तसेच भूमिहीन या सर्वांना कोणतेही प्रकारची आकारी पडीत जमीन मूळ मालकांना व वारसांना परत केलेली नसून ती जमीन ज्यांचा काहीही संबंध नाही अश्या लोकांच्या घशात घालण्याचा माणूस सरकारने ठेवलेला आहे व त्यांना देत आहे, त्यामुळे उच्च न्यायालय खंडपीठ संभाजीनगर औरंगाबाद येथील आदरणीय वरिष्ठ ॲड.श्री. अजित दादा काळे साहेब , उपाध्यक्ष शेतकरी संघटना महाराष्ट्र राज्य यांच्या मार्गदर्शनाखाली अन्नत्याग उपोषण शेती महामंडळ कार्यालय हरेगाव समोर दिनांक 14 ऑगस्ट 2026 पासून सुरू असून आज रविवार दिनांक 16 ऑगस्ट 2026 हा तिसरा दिवस आहे. सरकारी डॉक्टरांनी उपोषण कर्ते ॲड.अजित काळे साहेबांची आरोग्य तपासणी केली असून डॉक्टरांच्या तपासणी नुसार ॲड.अजित काळे साहेब यांना हार्ड अटॅक येण्याची तसेच इतर अवयव निकामी होण्याची शक्यता व्यक्त केलेली आहे तसेच इतर महिलांची तबीयत खूप खालावलेले आहे,त्यामुळे डॉक्टरांनी त्यांना तात्काळ आरोग्य तज्ञाकडे जाण्याकडे सांगितले आहे तरी याबद्दल सर्व 9 गावे आकारी पडीत शेतकरी बंधू भगिनींनो आपण ह्या अंतिम लढ्याला सर्वांनी साथ द्यावी ही नम्र विनंती.
प्रतिनिधी : दिलीप लोखंडे श्रीरामपूर







