आर. आर. विद्यालय व लाठी विद्यामंदिरात ७९ वा स्वातंत्र्यदिन उत्साहात साजरा; प्रभारी अध्यक्ष दिलीपभाऊ लाठी यांच्या हस्ते ध्वजारोहण!…


आर. आर. विद्यालय व लाठी विद्यामंदिरात ७९ वा स्वातंत्र्यदिन उत्साहात साजरा; प्रभारी अध्यक्ष दिलीपभाऊ लाठी यांच्या हस्ते ध्वजारोहण!…

सोमेश मुळे जळगाव: ईस्ट खानदेश एज्युकेशन सोसायटी संचलित आर. आर. विद्यालय, न्यू इंग्लिश मीडियम स्कूल आणि भा. का. लाठी विद्यामंदिर येथे ७९ वा स्वातंत्र्यदिन मोठ्या उत्साहात आणि देशभक्तीपर वातावरणात साजरा करण्यात आला.

कार्यक्रमाच्या सुरुवातीला संस्थेचे प्रभारी अध्यक्ष श्री. दिलीपभाऊ लाठी यांच्या हस्ते मुख्य ध्वजारोहण करण्यात आले. राष्ट्रगीत आणि ध्वजगीताच्या सुरावटींनी संपूर्ण परिसर देशप्रेमाने भारावून गेला होता. सर्वांनी तिरंग्याला मानवंदना दिली.

मान्यवरांची उपस्थिती
या सोहळ्याला संस्थेचे पदाधिकारी श्री. अनिल लाठी, श्री. अभिषेक लाठी आणि ज्येष्ठ शिक्षणतज्ज्ञ कासट सर प्रामुख्याने उपस्थित होते. मान्यवरांचे स्वागत विद्यालयाच्या मुख्याध्यापक व शिक्षक वृंदांनी केले.

विद्यार्थ्यांचा उत्साह
स्वातंत्र्यदिनानिमित्त शाळेतील विद्यार्थ्यांनी विविध देशभक्तीपर गीते आणि भाषणे सादर केली. शाळेचा परिसर आकर्षक पद्धतीने सजवण्यात आला होता. या प्रसंगी शाळेचे शिक्षक, शिक्षकेतर कर्मचारी, पालक आणि विद्यार्थी मोठ्या संख्येने उपस्थित होते. खाऊ वाटपाने कार्यक्रमाची सांगता झाली.


45
कृपया वोट करा

लोक1 न्यूजच्या बातम्याबद्दल मत व्यक्त करा

error: Content is protected !!