सहकार दरबार भरवणाऱ्या अभिजीत कुलकर्णी यांचे विशेष कौतुक!
पुणे जिल्हा सहकारी गृहनिर्माण संस्था आणि अपार्टमेंट्स महासंघाचे अध्यक्ष मा. सुहास पटवर्धन यांनी पत्राद्वारे श्री. अभिजीत कुलकर्णी (सहकार मित्र, पिंपरी मंच) यांच्या उत्कृष्ट कार्याचा गौरव केला आहे. गेरा एम्पोरियम येथे महाराष्ट्र दिन आणि जागतिक कामगार दिनाचे औचित्य साधून आयोजित केलेला ‘प्रथम सहकार दरबार’ हा त्यांचा कल्पक आणि दूरदृष्टीपूर्ण उपक्रम आहे!
औद्योगिक शहरात गृहनिर्माण संस्थांच्या सभासदांसाठी असे व्यासपीठ निर्माण करणे, व्यावसायिक मंडळींमध्ये सहकाराची आस्था जागृत करणे आणि समाजातील प्रतिष्ठित व्यक्ती, राजकीय दिग्गज व अधिकाऱ्यांशी समन्वय साधणे – हे अभिजीतजींचे नेतृत्व दाखवणारे उल्लेखनीय यश आहे. कार्यक्रमाचा वृत्तांत पाठवून आणि रेकॉर्ड ठेवून त्यांनी पुढील पिढीसाठी आदर्श वस्तुपाठही शिल्लक ठेवला.
अभिजीत कुलकर्णी यांचा हा निस्वार्थी प्रयत्न सहकार चळवळीला नवे बळ देणारा आहे.
प्रतिनिधी उमेश कुलकर्णी
9822548429









