पिंपरी-चिंचवडमध्ये पहिल्या पावसाची दमदार हजेरी; नागरिकांना उकाड्यातून दिलासा.


पिंपरी-चिंचवडमध्ये पहिल्या पावसाची दमदार हजेरी; नागरिकांना उकाड्यातून दिलासा

पिंपरी, प्रतिनिधी : इंद्रायणी नगर परिसर व भोसरी एमआयडीसी परिसरामध्ये मुसळधार पाऊस,

पिंपरी-चिंचवड शहरात अखेर मान्सूनपूर्व पहिल्या पावसाने दमदार हजेरी लावत नागरिकांना उकाड्यातून मोठा दिलासा दिला. सोमवारी दुपारनंतर अचानक वातावरणात बदल झाला. काळे ढग दाटून आले आणि काही वेळातच शहरातील विविध भागांत पावसाच्या सरी कोसळू लागल्या.

गेल्या काही दिवसांपासून वाढलेल्या तापमानामुळे नागरिक हैराण झाले होते. पहिल्या पावसामुळे वातावरणात गारवा निर्माण झाला असून नागरिकांनीही पावसाचा आनंद लुटला. अनेक ठिकाणी रस्त्यांवरील धूळ कमी झाली, तर झाडे आणि परिसरही स्वच्छ झाल्याचे चित्र पाहायला मिळाले.

दरम्यान, काही सखल भागांत किरकोळ पाणी साचल्याचे दिसून आले. वाहनचालकांना वाहतूक कोंडीचा सामना करावा लागला. तरीही पहिल्या पावसामुळे शेतकरी आणि नागरिकांमध्ये समाधानाचे वातावरण निर्माण झाले आहे.

हवामान विभागाने पुढील काही दिवसांत पावसाचा जोर वाढण्याची शक्यता व्यक्त केली असून नागरिकांनी आवश्यक ती खबरदारी घेण्याचे आवाहन करण्यात आले आहे.

प्रतिनिधी: शाम शिरसाठ.


51
कृपया वोट करा

लोक1 न्यूजच्या बातम्याबद्दल मत व्यक्त करा

error: Content is protected !!