संभाजीनगरमध्ये काल पहाटेच बुलडोझर कारवाई! एमआयएम नगरसेवक मतीन पटेल यांच्या घरावर महापालिकेचा हातोडा


संभाजीनगरमध्ये काल पहाटेच बुलडोझर कारवाई! एमआयएम नगरसेवक मतीन पटेल यांच्या घरावर महापालिकेचा हातोडा

छत्रपती संभाजीनगरमध्ये काल पहाटेपासून महापालिका प्रशासनाने धडक कारवाई करत एमआयएम नगरसेवक मतीन पटेल यांच्या घरावर बुलडोझर चालवला. या अचानक झालेल्या कारवाईमुळे शहरात मोठी खळबळ उडाली असून परिसरात तणावाचे वातावरण निर्माण झाले आहे.

प्राथमिक माहितीनुसार, निदा खानला लपवून ठेवण्यात आल्याच्या संशयावरून संबंधित घरावर ही मोठी कारवाई करण्यात आली. पहाटेच्या सुमारास महापालिका आणि प्रशासनाच्या पथकाने मोठ्या पोलीस बंदोबस्तात घटनास्थळी दाखल होत पाडकाम सुरू केले.

कारवाईदरम्यान कोणताही अनुचित प्रकार घडू नये यासाठी परिसरात मोठ्या प्रमाणावर पोलीस फौजफाटा तैनात करण्यात आला. स्थानिक नागरिकांमध्ये या कारवाईबाबत विविध चर्चांना उधाण आले असून प्रशासनाच्या भूमिकेकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.

एमआयएम नगरसेवकाच्या घरावर थेट बुलडोझर कारवाई झाल्याने राजकीय वर्तुळातही चर्चांना वेग आला आहे. ही कारवाई केवळ अतिक्रमणविरोधी आहे की अन्य गंभीर कारणांशी संबंधित आहे, याबाबत प्रशासनाकडून अधिकृत माहितीची प्रतीक्षा आहे.

महापालिका आणि पोलीस प्रशासन या प्रकरणाचा अधिक तपास करत असून कारवाईमागील संपूर्ण सत्य पुढील चौकशीनंतर स्पष्ट होणार आहे.
संभाजीनगरमधील या कारवाईने प्रशासनाच्या कठोर भूमिकेची पुन्हा एकदा चर्चा सुरू झाली आहे.

पत्रकार उमेश कुलकर्णी
9822548429


26
कृपया वोट करा

लोक1 न्यूजच्या बातम्याबद्दल मत व्यक्त करा

error: Content is protected !!