मनोज जरांगे पाटील पुन्हा उपोषणाच्या मैदानात; ३० मे पासून आंतरवाली सराटीत आमरण उपोषण


​मनोज जरांगे पाटील पुन्हा उपोषणाच्या मैदानात; ३० मे पासून आंतरवाली सराटीत आमरण उपोषण

​मराठा आरक्षणाच्या मागणीसाठी मनोज जरांगे पाटील यांनी पुन्हा एकदा आंदोलनाचे हत्यार उपसले आहे. आगामी ३० मे पासून ते आंतरवाली सराटी येथे आमरण उपोषणाला बसणार असल्याची घोषणा त्यांनी आज केली आहे. आंदोलनाची पुढील दिशा ठरवण्यासाठी आयोजित करण्यात आलेल्या बैठकीत त्यांनी हा महत्त्वपूर्ण निर्णय जाहीर केला.
​यावेळी बोलताना जरांगे पाटील यांनी सरकारवर गंभीर आरोप केले. ‘५८ लाख नोंदी सापडूनही सरकार प्रमाणपत्र वाटण्यास टाळाटाळ करत असून मराठा समाजाचा द्वेष करत आहे’, असे ते म्हणाले. तसेच, देवेंद्र फडणवीस यांनी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्याप्रमाणे मोहीम राबवून समाजाला प्रमाणपत्रे द्यावीत, असे आवाहनही त्यांनी यावेळी केले.
​या निर्णयामुळे मराठा आरक्षणाचा लढा पुन्हा एकदा तीव्र होण्याची शक्यता निर्माण झाली आहे. ३० मे पासून सुरू होणाऱ्या या उपोषणाकडे आता संपूर्ण राज्याचे लक्ष लागले आहे.

पत्रकार उमेश कुलकर्णी
9822548429


26
कृपया वोट करा

लोक1 न्यूजच्या बातम्याबद्दल मत व्यक्त करा

हे देखील पहा...

error: Content is protected !!