टाकळीभानमध्ये ‘स्वर्णिम भारत रथा’चे स्वागत; सुख-शांतीचा दिला संदेश.


टाकळीभानमध्ये ‘स्वर्णिम भारत रथा’चे स्वागत; सुख-शांतीचा दिला संदेश


टाकळीभान प्रतिनिधी – प्रजापिता ब्रह्माकुमारी ईश्वरीय विश्व विद्यालयाच्या वतीने सुख, शांती आणि सहजराजयोगाचा संदेश देणाऱ्या ‘स्वर्णिम भारत रथा’चे टाकळीभान येथे उत्साहात आगमन झाले. श्रीरामपूर कृषी उत्पन्न बाजार समितीचे माजी सभापती नानासाहेब पवार यांच्या हस्ते रथाचे जंगी स्वागत करण्यात आले.
यावेळी श्रीरामपूर सेवाकेंद्राच्या संचालिका ब्रह्माकुमारी मंदादिदी यांनी उपस्थितांना मार्गदर्शन करत अध्यात्म, मानसिक शांती आणि सकारात्मक जीवनशैलीचे महत्त्व पटवून दिले. उद्योगपती अश्पाक शेख यांनी ब्रह्माकुमारी संस्थेच्या जागतिक शांततेसाठी सुरू असलेल्या कार्याचे कौतुक केले. “मानवी जीवनातील भय, चिंता, रोग आणि तणावमुक्तीसाठी अध्यात्म हा उत्तम मार्ग असून नागरिकांनी सेवाकेंद्राला भेट द्यावी,” असे आवाहन यावेळी करण्यात आले.
कार्यक्रमास माजी आमदार भाऊसाहेब कांबळे, मौलाना अहमद शेख, पोलीस हेडकॉन्स्टेबल कुमार बैसाने, माजी उपसरपंच राजेंद्र कोकणे, मधुकर कोकणे, अविनाश लोखंडे, काकासाहेब डिके, विष्णुपंत पटारे, आप्पासाहेब रणनवरे, गोरख खुर्द, मधुकर गायकवाड, बाबा सय्यद, ब्रह्माकुमार शिके भाईजी, रखी भाईजी, कोकाटे भाईजी, रामनाथ भाईजी, गोयल भाईजी यांच्यासह सर्व ब्रह्माकुमार-कुमारी, सेवाधारी आणि ग्रामस्थ मोठ्या संख्येने उपस्थित होते.

प्रतिनिधी: दिलीप लोखंडे श्रीरामपूर.


26
कृपया वोट करा

लोक1 न्यूजच्या बातम्याबद्दल मत व्यक्त करा

हे देखील पहा...

error: Content is protected !!