पारवा येथे स्मार्ट मीटरवर प्रश्नचिन्ह; नागरिकांनी मांडल्या शंका:-
जि. वाशिम:ता.मनोरा:दि. 11 जून :-तालुक्यातील पारवा येथे महावितरणच्या दापूरा उपविभागामार्फत स्मार्ट मीटर बसविण्याची प्रक्रिया सुरू करण्यात आली असता ग्रामस्थांनी यासंदर्भात विविध शंका उपस्थित करत आपली भूमिका मांडली. सध्याचे जुने मीटर व्यवस्थित कार्यरत असताना नवीन स्मार्ट मीटरबाबत अधिक माहिती देण्यात यावी, अशी मागणी नागरिकांनी केली.
ग्रामस्थांच्या मते, स्मार्ट मीटरमुळे वीज बिल, वापर पद्धती तसेच भविष्यातील तांत्रिक बाबींविषयी स्पष्टता असणे आवश्यक आहे. नागरिकांना विश्वासात घेऊन तसेच योग्य मार्गदर्शन केल्यानंतरच पुढील प्रक्रिया राबविण्यात यावी, असे मत यावेळी व्यक्त करण्यात आले.
दरम्यान, महावितरणच्या कर्मचाऱ्यांनी ग्रामस्थांशी संवाद साधून त्यांचे म्हणणे जाणून घेतले. यावेळी गावातील नागरिकांनी शांततेत आपली भूमिका मांडली.
स्थानिक रहिवासी तथा गोरसेना तालुका अध्यक्ष सुनील राठोड यांनी, “वीज ही नागरिकांची मूलभूत गरज आहे. गावात सध्या जुन्या मीटरद्वारे वीजपुरवठा सुरळीत सुरू आहे. त्यामुळे नागरिकांच्या शंकांचे समाधान झाल्यानंतरच पुढील निर्णय व्हावा,” असे मत व्यक्त केले.
पत्रकार :विजय रणभोर, पुणे.
9359280220.










