सांगली पुन्हा हदरली, भरदिवसा गोळीबार शासन यंत्रणेचे तीन तेरा :-
सांगली :दि 11 जून :-सांगली :शहरातील अभयनगर परिसरात भरदिवसा झालेल्या थरारक गोळीबारात वेदांत मारुती बंडगर या अल्पवयीन मुलाचा मृत्यू झाल्याने शहरात खळबळ उडाली आहे. हमाल नेते बाळासाहेब बंडगर यांचा नातू असलेला वेदांत घरासमोरील पोर्चमध्ये उभा असताना चार ते पाच अज्ञात हल्लेखोरांनी घरात घुसून त्याच्यावर जवळून गोळ्या झाडल्या.
गोळी डोळ्याजवळ लागल्याने वेदांतचा जागीच मृत्यू झाला. या घटनेनंतर अभयनगर परिसरात भीतीचे वातावरण निर्माण झाले असून नागरिकांमध्ये प्रचंड संताप व्यक्त होत आहे.
घटनेची माहिती मिळताच पोलीस अधीक्षक तुषार दोषी यांनी घटनास्थळी धाव घेत तपासाचा आढावा घेतला. प्राथमिक तपासात माथाडी कामगार आणि व्यावसायिकांमधील जुन्या वादातून हा हल्ला झाल्याची शक्यता पोलिसांकडून व्यक्त करण्यात येत आहे.
दरम्यान, संजयनगर पोलीस, स्थानिक गुन्हे अन्वेषण शाखा (एलसीबी) आणि विशेष पथकांनी आरोपींच्या शोधासाठी व्यापक मोहीम हाती घेतली असून विविध जिल्ह्यांमध्ये नाकाबंदी करण्यात आली आहे. हल्लेखोरांचा माग काढण्यासाठी पोलिसांकडून सीसीटीव्ही फुटेज आणि अन्य तांत्रिक पुराव्यांची तपासणी सुरू आहे.
पत्रकार :विजय रणभोर, पुणे.
9359280220.










