नांदगाव येथे १० वर्षीय मुलीच्या कथित अपहरणाची घटना; सखोल तपासाची मागणी:-


नांदगाव येथे १० वर्षीय मुलीच्या कथित अपहरणाची घटना; सखोल तपासाची मागणी:-

जि.वाशिम,ता.नांदगाव:दि. 12 जून :-नांदगाव येथे १० वर्षीय मुलीच्या कथित अपहरणाची धक्कादायक घटना समोर आल्याने परिसरात खळबळ उडाली आहे. आज दुपारी सुमारे २ वाजण्याच्या सुमारास घडलेल्या या घटनेमुळे पालकांमध्ये चिंता व्यक्त केली जात आहे.

मिळालेल्या माहितीनुसार, रोहिणी रवी साखरे (वय १०) हिने सांगितले की, मोबाईल चार्जर मागण्याच्या बहाण्याने आलेल्या काही अनोळखी व्यक्तींनी तिला काळ्या रंगाच्या कारमध्ये बसविले. त्यानंतर तिला धानोरा मार्गे वाशिमपर्यंत नेण्यात आले. मात्र, प्रसंगावधान राखत तिने स्वतःची सुटका करून घेतल्याचे सांगितले जात आहे.

घटनेची माहिती समोर आल्यानंतर नागरिकांनी या प्रकरणाची तातडीने आणि निष्पक्ष चौकशी करण्याची मागणी केली आहे. संबंधित भागातील सीसीटीव्ही फुटेज तपासणे, संशयित वाहनाचा शोध घेणे तसेच घटनेमागील सत्य परिस्थिती उघड करण्यासाठी सखोल तपास करण्याची आवश्यकता व्यक्त केली जात आहे.

तसेच भविष्यात अशा घटना टाळण्यासाठी गाव व परिसरात सीसीटीव्ही यंत्रणा अधिक सक्षम करणे, नियमित पोलीस गस्त वाढविणे आणि बालसुरक्षेसंदर्भातील उपाययोजनांची प्रभावी अंमलबजावणी करावी, अशीही मागणी नागरिकांकडून होत आहे.

दरम्यान, या प्रकरणाची अधिकृत चौकशी पूर्ण झाल्यानंतरच घटनेचे नेमके स्वरूप स्पष्ट होणार असून, दोषी आढळणाऱ्यांवर कठोर कारवाई करण्यात यावी, अशी अपेक्षा नागरिकांनी व्यक्त केली आहे.

पत्रकार : विजय रणभोर, पुणे.
9359280220.


26
कृपया वोट करा

लोक1 न्यूजच्या बातम्याबद्दल मत व्यक्त करा

error: Content is protected !!