हरदोली रोडवर गोवंशाची अवैध वाहतूक उघड; दोन आरोपी ताब्यात, ६.५० लाखांचा मुद्देमाल जप्त:


हरदोली रोडवर गोवंशाची अवैध वाहतूक उघड; दोन आरोपी ताब्यात, ६.५० लाखांचा मुद्देमाल जप्त:-

जि. वर्धा, ता.आर्वी:दि. 20 जून :-आर्वी पोलिसांनी हरदोली रोड परिसरात गोवंशाची अवैध वाहतूक करणाऱ्या दोन आरोपींना ताब्यात घेत मोठी कारवाई केली. गोपनीय माहितीच्या आधारे पोलिसांनी ही धडक कारवाई केली.

या प्रकरणात स्वप्नील विजयराव कांबळे (वय २२, रा. वाल्मीक वॉर्ड, आर्वी) आणि राजू सुखदेवराव इंगळे (वय २४, रा. वाल्मीक वॉर्ड, आर्वी) यांना अटक करण्यात आली आहे.

पोलिसांनी हरदोली रोडवर संशयित मालवाहू वाहनाची तपासणी केली असता, वाहनामध्ये पाच गोवंश अत्यंत अमानुष पद्धतीने वाहतूक करताना आढळून आले. जनावरांसाठी चारा-पाण्याची कोणतीही व्यवस्था नव्हती तसेच प्रथमोपचार सुविधाही उपलब्ध नसल्याचे निदर्शनास आले. त्यानंतर पंचनामा करून गोवंशांची सुटका करण्यात आली.

कारवाईदरम्यान झेनॉन पिकअप वाहन (क्र. एमएच-३२ क्यू-२४७१) किंमत अंदाजे ६ लाख रुपये आणि पाच गोवंश किंमत ५० हजार रुपये असा एकूण ६ लाख ५० हजार रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला. जप्त करण्यात आलेल्या गोवंशांना सुरक्षिततेच्या दृष्टीने ‘पिपल फॉर ॲनिमल्स’ संस्थेत दाखल करण्यात आले आहे.

या प्रकरणी आरोपींविरुद्ध प्राणी संरक्षण अधिनियम, प्राणी परिवहन अधिनियम तसेच महाराष्ट्र पशुसंवर्धन व संरक्षण अधिनियमातील विविध कलमान्वये गुन्हा दाखल करण्यात आला असून पुढील तपास सुरू आहे.

पत्रकार : विजय रणभोर, पुणे.
9359280220.


26
कृपया वोट करा

लोक1 न्यूजच्या बातम्याबद्दल मत व्यक्त करा

error: Content is protected !!