लेवा एज्युकेशनल युनियन संचालित सरस्वती प्रायमरी इंग्लिश मीडियम स्कूलमध्ये विद्यार्थी पदग्रहण समारंभ उत्साहात संपन्न!..


लेवा एज्युकेशनल युनियन संचालित सरस्वती प्रायमरी इंग्लिश मीडियम स्कूलमध्ये विद्यार्थी पदग्रहण समारंभ उत्साहात संपन्न!..

सोमेश मुळे जळगाव: लेवा एज्युकेशनल युनियन संचालित सरस्वती प्रायमरी इंग्लिश मीडियम स्कूल, एम.आय.डी.सी., जळगाव येथे दि. १५ जुलै २०२६ (बुधवार) रोजी शैक्षणिक वर्ष २०२६-२७ साठी विद्यार्थी नेतृत्व मंडळाच्या (student councils) पदग्रहण समारंभाचे अत्यंत उत्साहपूर्ण वातावरणात आयोजन करण्यात आले होते. शालेय स्तरापासूनच विद्यार्थ्यांमध्ये नेतृत्वगुण, शिस्त आणि जबाबदारीची जाणीव निर्माण व्हावी, या उद्देशाने या सोहळ्याचे आयोजन करण्यात आले.
कार्यक्रमाची सुरुवात विद्यापीठाच्या परंपरेनुसार सुश्राव्य स्वागतगीताने करण्यात आली. यामुळे संपूर्ण सभागृहात चैतन्यमय वातावरण निर्माण झाले.
विद्यार्थी प्रतिनिधींचा शपथविधी
या विशेष सोहळ्यात चालू शैक्षणिक वर्षासाठी लोकशाही मार्गाने निवडून आलेल्या नवनियुक्त विद्यार्थी प्रतिनिधींना त्यांच्या पदाचे अधिकृत बॅजेस आणि स्कार्फ प्रदान करण्यात आले. त्यानंतर सर्व पदाधिकाऱ्यांनी शाळेच्या नियमांचे पालन करत, आपल्या कर्तव्याशी प्रामाणिक राहण्याची आणि शिस्त राखण्याची सामूहिक शपथ घेतली.
मान्यवरांचे मार्गदर्शन
या प्रसंगी लेवा एज्युकेशनल युनियन संस्थेचे अध्यक्ष प्रज्ञावंत श्री. नंदकुमार गोपाळराव बेंडाळे सर यांनी नवनियुक्त विद्यार्थी प्रतिनिधींचे कौतुक केले व त्यांना भावी वाटचालीस शुभेच्छा दिल्या. “पद हे केवळ अधिकाराचे नसून ते जबाबदारीचे प्रतीक आहे. विद्यार्थ्यांनी शालेय जीवनातच नेतृत्वगुण, आत्मविश्वास आणि सामाजिक उत्तरदायित्व विकसित करून शाळेचे नाव अधिक उज्ज्वल करावे,” असे आवाहन त्यांनी आपल्या मार्गदर्शनात केले.
कार्यक्रमाच्या यशस्वीतेसाठी शाळेचे प्राचार्य डेविड दास सर यांचे मार्गदर्शन लाभले. या सोहळ्याला शाळेतील शिक्षक, शिक्षकेतर कर्मचारी आणि विद्यार्थी मोठ्या संख्येने उपस्थित होते. कार्यक्रमाची सांगता राष्ट्रगीताने करण्यात आली.


47
कृपया वोट करा

लोक1 न्यूजच्या बातम्याबद्दल मत व्यक्त करा

error: Content is protected !!