MPSC च्या ऑनलाइन परीक्षेबाबत मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचा मोठा निर्णय


MPSC च्या ऑनलाइन परीक्षेबाबत मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचा मोठा निर्णय

मुंबई : महाराष्ट्र लोकसेवा आयोगाच्या (MPSC) संगणकआधारित (CBT) ऑनलाइन परीक्षा पद्धतीबाबत मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी महत्त्वाचा निर्णय घेतला आहे. नवीन ऑनलाइन परीक्षा पद्धत तूर्तास लागू न करता ती ऑगस्ट २०२७ पासून टप्प्याटप्प्याने लागू करण्याचे निर्देश देण्यात आले आहेत.

या निर्णयानुसार, ऑगस्ट २०२७ पर्यंत MPSC च्या सर्व परीक्षा सध्याच्या प्रचलित ऑफलाइन पद्धतीनेच घेतल्या जाणार आहेत. ऑनलाइन परीक्षा पद्धतीसाठी विद्यार्थी तसेच परीक्षा घेणारी शासकीय यंत्रणा या दोघांनाही आवश्यक तयारी करण्यासाठी पुरेसा कालावधी मिळावा, हा या निर्णयामागील प्रमुख उद्देश असल्याचे सांगण्यात आले आहे.

नवीन परीक्षा पद्धती लागू करण्यापूर्वी आवश्यक तांत्रिक सुविधा, परीक्षा केंद्रांची तयारी, पारदर्शकता आणि सुरक्षेच्या दृष्टीने सर्व बाबींची पूर्तता केली जाणार आहे. त्यानंतरच ऑनलाइन परीक्षा प्रणाली टप्प्याटप्प्याने सुरू केली जाईल.

मुख्यमंत्र्यांच्या या निर्णयामुळे MPSC परीक्षांची तयारी करणाऱ्या लाखो स्पर्धा परीक्षा विद्यार्थ्यांना मोठा दिलासा मिळाला आहे. अचानक परीक्षा पद्धतीत बदल होणार नसल्याने उमेदवारांना सध्याच्या पद्धतीनुसार तयारी करण्यासाठी अधिक वेळ उपलब्ध होणार आहे.

प्रतिनिधी उमेश कुलकर्णी
9822548429


47
कृपया वोट करा

लोक1 न्यूजच्या बातम्याबद्दल मत व्यक्त करा

error: Content is protected !!