वॉर्ड क्रमांक 10 मधील लोकांना प्रॉपर्टी कार्ड द्या :-


वॉर्ड क्रमांक 10 मधील लोकांना प्रॉपर्टी कार्ड द्या :-

सांगली : दी 16 जुलै :-:सांगली, मिरज आणि कुपवाड महापालिकेच्या प्रभाग क्रमांक १० मधील राजर्षी शाहू कॉलनी (नवीन वसाहत) येथील नागरिकांना अद्याप प्रॉपर्टी कार्ड मिळाले नसल्याने शासनाच्या विविध घरकुल योजनांचा लाभ घेण्यात अडचणी निर्माण होत आहेत.

त्यामुळे या भागाचा रखडलेला सिटी सर्व्हे तातडीने पूर्ण करून नागरिकांना प्रॉपर्टी कार्ड वितरित करावेत, अशी मागणी नगरसेवक जगन्नाथ ठोकळे यांनी महापालिका आयुक्त संजिता महापात्रा यांच्याकडे निवेदनाद्वारे केली आहे.

निवेदनानुसार, सन १९६१-६२ मध्ये तत्कालीन नगरपरिषदेच्या जागेवरील झोपडपट्टीला आग लागल्यानंतर तेथील नागरिकांचे कायमस्वरूपी पुनर्वसन करण्यात आले होते. त्यावेळी २१० कुटुंबांना घरे, तर ३४ कुटुंबांना भूखंड देण्यात आले होते. त्यानंतर नगरपालिकेच्या ठरावानुसार या जागा रहिवाशांना कायमस्वरूपी खरेदीने देण्याचा निर्णयही घेण्यात आला होता.

या भागातील बहुतांश नागरिक अनुसूचित जातीचे असून अनेक लाभार्थ्यांना रमाई आवास योजनेअंतर्गत घरकुलासाठी अनुदान मंजूर झाले आहे. मात्र, सिटी सर्व्हे आणि प्रॉपर्टी कार्ड नसल्याने बांधकाम परवानगी तसेच पूर्णत्वाचा दाखला मिळत नसल्यामुळे अंतिम अनुदान रखडले आहे, अशी बाब ठोकळे यांनी निदर्शनास आणून दिली.

ठोकळे यांनी सांगितले की, २०१३ पासून या प्रश्नासाठी सातत्याने पाठपुरावा सुरू असून महापालिकेने हद्द मोजणीसाठी २ लाख ९० हजार रुपये नगर भूमापन कार्यालयाकडे जमा केले आहेत. हद्द मोजणीचे काम पूर्ण झाले असले, तरी सामिलीकरण व आंतरविभाजनाची फाईल अद्याप नगररचना विभाग आणि नगर भूमापन कार्यालयात प्रलंबित असल्याने पुढील प्रक्रिया रखडली आहे.

तसेच,महसूल व वन विभागाच्या नवीन शासन निर्णयानुसार निवासी क्षेत्रांचा सिटी सर्व्हे करून प्रॉपर्टी कार्ड देण्याचे निर्देश आहेत.या पार्श्वभूमीवर राजर्षी शाहू कॉलनीचा सिटी सर्व्हे तातडीने पूर्ण करून नागरिकांना त्यांच्या हक्काची प्रॉपर्टी कार्डे उपलब्ध करून द्यावीत, अशी आग्रही मागणी नगरसेवक जगन्नाथ ठोकळे यांनी महापालिका प्रशासनाकडे केली आहे.

पत्रकार :विजय रणभोर, पुणे.
9359280220.


47
कृपया वोट करा

लोक1 न्यूजच्या बातम्याबद्दल मत व्यक्त करा

error: Content is protected !!