मिरज शासकीय रुग्णालयातील सेवांचे लोकार्पण :-
सांगली : दी. 17 जुलै :-मिरज येथील शासकीय वैद्यकीय महाविद्यालय व रुग्णालयात अत्याधुनिक लाँड्री विभाग आणि मेल सर्जिकल सेमी आयसीयूचे लोकार्पण सांगलीचे पालकमंत्री चंद्रकांत पाटील यांच्या हस्ते करण्यात आले.
याचवेळी शासकीय वैद्यकीय महाविद्यालय आणि पोलीस प्रशासनाच्या संयुक्त विद्यमाने ‘नशामुक्त सांगली अभियानाचाही शुभारंभ झाला.
यावेळी पालकमंत्र्यांनी सांगितले की, नव्या सुविधांमुळे गंभीर रुग्णांना अधिक दर्जेदार उपचार मिळतील, तसेच आधुनिक लाँड्री विभागामुळे स्वच्छता व संसर्ग नियंत्रणाला मोठी मदत होणार आहे. ‘नशामुक्त सांगली’ अभियानातून युवकांमध्ये व्यसनमुक्तीबाबत जनजागृती करून समाजात सकारात्मक संदेश पोहोचविण्यात येणार असल्याचे त्यांनी सांगितले.
पत्रकार : विजय रणभोर, पुणे. 9359280220.
Views: 92






