पुण्यात विषारी दारू व ड्रग्ज निर्मितीचा मोठा कट उधळला; १५ लाख लिटर दारू तयार होईल इतके साहित्य जप्त
पुणे : पुण्याच्या दौंड तालुक्यातील कुरकुंभ एमआयडीसी परिसरात अंमली पदार्थ विरोधी टास्क फोर्सने मोठी कारवाई करत विषारी दारू आणि ड्रग्ज निर्मितीचा कथित कट उधळून लावला आहे. ‘समर्थ लॅबोरेटरीज’ या कंपनीवर टाकलेल्या छाप्यात मोठ्या प्रमाणात रासायनिक साहित्य जप्त करण्यात आले.
या कारवाईत ३,४२० किलो क्लोरल हायड्रेट आणि ५,८०० लिटर रॉ केमिकल जप्त करण्यात आले. प्राथमिक तपासानुसार, या साहित्यापासून तब्बल १५ लाख लिटर विषारी दारू तयार केली जाऊ शकली असती, असा तपास यंत्रणांचा अंदाज आहे.
या प्रकरणात चार संशयितांची नावे समोर आली असून त्यांच्याविरोधात पुढील कायदेशीर कारवाई सुरू आहे. तसेच या प्रकरणाचा ड्रग्ज आणि बेकायदेशीर मद्यनिर्मितीशी संबंध आहे का, याचाही तपास सुरू आहे.
प्राथमिक माहितीनुसार, संबंधित ‘समर्थ लॅबोरेटरीज’ ही फॅक्ट्री किशोर सुर्वे यांच्या मालकीची असल्याचे तपासात निष्पन्न झाले असून, या संपूर्ण प्रकरणाचा सखोल तपास अंमली पदार्थ विरोधी टास्क फोर्सकडून सुरू आहे.
प्रतिनिधी उमेश कुलकर्णी
9822548429






