भारताची आर्थिक भरारी; २०४७ पर्यंत विकसित भारताचे लक्ष्य


भारताची आर्थिक भरारी; २०४७ पर्यंत विकसित भारताचे लक्ष्य

नवी दिल्ली : स्वातंत्र्यदिनानिमित्त लाल किल्ल्यावरून देशाला संबोधित करताना पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी भारताच्या आर्थिक प्रगतीचा उल्लेख करत ‘विकसित भारत २०४७’ या संकल्पाचा पुनरुच्चार केला.
“एकेकाळी भारताची गणना ‘फ्रेजाइल फाईव्ह’ अर्थात कमकुवत पाच अर्थव्यवस्थांमध्ये केली जात होती. मात्र गेल्या १२ वर्षांत भारताने मोठी आर्थिक झेप घेतली असून, आज भारत जगातील वेगाने वाढणाऱ्या प्रमुख अर्थव्यवस्थांपैकी एक आहे,” असे पंतप्रधान मोदी यांनी सांगितले.
भारताला २०४७ पर्यंत विकसित राष्ट्र बनवण्याचे लक्ष्य असल्याचे त्यांनी स्पष्ट केले. देशाच्या विकासासाठी आत्मनिर्भरता, तंत्रज्ञान, उद्योग, युवकांची शक्ती आणि नवोन्मेष यांना चालना देण्यावर सरकारचा भर असल्याचेही त्यांनी अधोरेखित केले.
“देशातील १४० कोटी नागरिकांची शक्ती आणि संकल्प एकत्र आला, तर विकसित भारताचे स्वप्न साकार करण्यापासून कोणतीही ताकद रोखू शकत नाही,” असा विश्वास पंतप्रधान मोदी यांनी व्यक्त केला

प्रतिनिधी उमेश कुलकर्णी


45
कृपया वोट करा

लोक1 न्यूजच्या बातम्याबद्दल मत व्यक्त करा

error: Content is protected !!