प्रवरा प्रेस क्लबच्या अध्यक्षपदी कोडीराम नेहे तर उपाध्यक्षपदी प्रकाश औताडे व सचिव शंकर सोनवणे यांची निवड !…


प्रवरा प्रेस क्लबच्या अध्यक्षपदी कोडीराम नेहे तर उपाध्यक्षपदी प्रकाश औताडे व सचिव शंकर सोनवणे यांची निवड !

टाकळीभान (प्रतिनिधी) प्रवरा प्रेस क्लबच्या अध्यक्षपदी कोडीराम नेहे (लोहगाव) तर उपाध्यक्षपदी प्रकाश औताडे (बाभळेश्वर) यांची तर सचिवपदी शंकर सोनवणे लोणी यांची दसऱ्याच्या शुभ मुहूर्तावर निवड घोषित करण्यात आली आहे. प्रवरा प्रेस क्लबची गेल्या दहा ते अकरा वर्षांपूर्वी स्थापना झाली होती त्यावेळी प्रवरा प्रेस क्लब च्या अध्यक्षपदी पत्रकार छायाचित्रकार विजय बोडखे यांची अध्यक्षपदी तर उपाध्यक्षपदी प्रमोद कुंभकर्ण यांची निवड करण्यात आली होती गेल्या दहा ते अकरा वर्षापासून या क्लबच्या माध्यमातून अनेक विविध कार्यक्रम आयोजित करण्यात आले होते यामध्ये प्रेस क्लबच्या वतीने शाहीर किशोर सासवडे यांना प्रेस क्लबच्या वतीने पुरस्कार देऊन गौरविण्यात आले होते.प्रेस क्लबच्या माध्यमातून ग्रामीण भागात विविध कार्यक्रमाचे आयोजन प्रेस क्लबच्या सदस्यांच्या वतीने करण्यात आले.या प्रेस क्लबच्या जडणघडणीत राहाता व प्रवरा परिसरातील ज्येष्ठ पत्रकारांच्या आशीर्वादाने हा प्रेस क्लब पुढे सुरू आहे.गेल्या दहा ते अकरा वर्षापासून अध्यक्षपदाची धुरा पत्रकार विजय बोडखे व प्रमोद कुंभकर्ण यांनी सांभाळली असल्यामुळे त्यांनी बाकीच्याही ग्रामीण भागातील पत्रकारांना या पदाचा लाभ मिळावा या उद्देशाने ही निवड दसऱ्याच्या शुभ मुहूर्तावर एक वर्षासाठी जाहीर केली आहे.यामध्ये प्रवरा प्रेस क्लबच्या सचिव पदी लोणी येथील पत्रकार शंकर सोनवणे यांची तर ज्येष्ठ सदस्य म्हणून पत्रकार रवींद्र काकडे,सुहास वैद्य सिताराम चांडे.संजय शिवलेकर.सुरेश ठोके.शरद तांबे.राजकुमार गडकरी

 

,संजय कोळसे,दादासाहेब म्हस्के,नवनाथ दिघे,प्रमोद कुंभकर्ण,यमन पुलाटे,शहाजी दिघे,गणेश आहेर,लखन गव्हाणे,हरीश दिमोटे,कैलास घोरपडे,साईप्रसाद कुंभकर्ण,परेश कापसे,कैलास विखे,विजय बोडखे,विनोद पारखे,दत्तात्रेय विखे,अनिल बेंद्रे,ज्ञानेश्वर साबळे,गोरख गवारे,कुणाल गायकवाड,रूपाली भालेराव,शफिक मनियार,बापूसाहेब अनाप,गणेश कुंभकर्ण,प्रवीण बेंद्रे,अरुण बोरुडे, संतोष बोरुडे,सुरेश तरकसे,साहेबराव चोखर,योगेश कडसकर,सह ग्रामीण भागातील पत्रकारांनी कोंडीराम नेहे व प्रकाश औताडे तसेच शंकर सोनवणे यांचे अभिनंदन केले आहे प्रवरा प्रेस क्लबचा या वर्षीचा पुरस्कार थोड्याच दिवसात ग्रामीण भागातील (महाराज) यांना जाहीर करण्यात येणार आहे.नवनिर्वाचित प्रवरा प्रेस क्लबचे अध्यक्ष,उपाध्यक्ष,सचिव यांचे सर्व स्तरातून अभिनंदन होत आहे.थोड्याच दिवसात प्रेस क्लबच्या पुरस्कार वितरण सोहळा व नवीन पदाधिकाऱ्यांचा सत्कार समारंभ आयोजित करणार येणार असल्याचे संघटनेच्या वतीने घोषित करण्यात आले आहे.

प्रतिनिधी:  दिलीप लोखंडे,श्रीरामपूर


67
कृपया वोट करा

लोक1 न्यूजच्या बातम्याबद्दल मत व्यक्त करा

error: Content is protected !!