विधान परिषद निवडणुकीमुळे नागपूर पदवीधर मतदारसंघात दोन दिवस ड्राय डे!
२१ ऑक्टोबर सायंकाळी ४ ते २३ ऑक्टोबर सायंकाळी ४ वाजेपर्यंत मद्यविक्री बंद
नागपूर : विधान परिषद निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर नागपूर पदवीधर मतदारसंघातील सर्व जिल्ह्यांमध्ये दोन दिवसांचा ड्राय डे जाहीर करण्यात आला आहे. या कालावधीत सर्व मद्यविक्रीची दुकाने बंद ठेवण्याचे निर्देश प्रशासनाकडून देण्यात आले आहेत.
राज्यात विधान परिषदेच्या पाच जागांसाठी २३ ऑक्टोबर रोजी मतदान होणार आहे. या निवडणुकीच्या अनुषंगाने २१ ऑक्टोबर रोजी सायंकाळी ४ वाजल्यापासून २३ ऑक्टोबर रोजी सायंकाळी ४ वाजेपर्यंत मद्यविक्री बंद ठेवण्याचे निर्देश देण्यात आल्याची माहिती आहे.
निवडणूक प्रक्रिया शांततेत आणि सुरळीत पार पडावी, तसेच निवडणूकविषयक नियमांचे पालन व्हावे, या उद्देशाने हा निर्णय घेण्यात आला आहे. संबंधित कालावधीत मद्यविक्री करणाऱ्या दुकानदारांनी प्रशासनाच्या निर्देशांचे काटेकोरपणे पालन करावे, असे आवाहन करण्यात आले आहे.
प्रतिनिधी उमेश कुलकर्णी





