शिक्षक-पदवीधर निवडणुकीच्या प्रचाराच्या तोफा थंडावल्या; २३ ऑक्टोबरला मतदान


शिक्षक-पदवीधर निवडणुकीच्या प्रचाराच्या तोफा थंडावल्या; २३ ऑक्टोबरला मतदान

मुंबई : महाराष्ट्र विधान परिषदेच्या शिक्षक व पदवीधर मतदारसंघांतील पाच जागांसाठी सुरू असलेल्या निवडणूक प्रचाराच्या तोफा थंडावल्या आहेत. उमेदवारी अर्ज मागे घेण्याची मुदत संपल्यानंतर आता निवडणुकीचे चित्र स्पष्ट झाले असून, विविध मतदारसंघांत राजकीय पक्षांच्या उमेदवारांसह बंडखोर उमेदवारांमुळेही निवडणुकीत चुरस निर्माण झाली आहे.
पुणे, नागपूर, अमरावती आणि छत्रपती संभाजीनगर या मतदारसंघांमध्ये महायुती आणि महाविकास आघाडी यांच्यात प्रमुख लढती होणार आहेत. काही ठिकाणी बंडखोरी झाल्याने राजकीय पक्षांसमोर आव्हान निर्माण झाले आहे.
प्रचाराची मुदत संपल्याने आता उमेदवारांचे लक्ष मतदारांशी संपर्क साधण्यावर आणि मतदानाच्या तयारीवर केंद्रित झाले आहे. येत्या २३ ऑक्टोबर रोजी मतदान होणार असून, २७ ऑक्टोबर रोजी मतमोजणी होणार आहे. या निवडणुकीच्या निकालाकडे राजकीय वर्तुळाचे लक्ष लागले आहे.
— पत्रकार उमेश कुलकर्णी
मोबा. ९८२२५४८४२९


67
कृपया वोट करा

लोक1 न्यूजच्या बातम्याबद्दल मत व्यक्त करा

error: Content is protected !!