अॅल्युमिनियमच्या भांड्यांसाठी नवीन BIS मानके; उत्पादकांना नियमांचे पालन बंधनकारक


अॅल्युमिनियमच्या भांड्यांसाठी नवीन BIS मानके; उत्पादकांना नियमांचे पालन बंधनकारक

नवी दिल्ली : अॅल्युमिनियमच्या भांड्यांची गुणवत्ता सुनिश्चित करण्यासाठी केंद्र सरकारने नवीन गुणवत्ता नियंत्रण आदेश जारी केला आहे. त्यानुसार, अॅल्युमिनियमच्या भांड्यांसाठी IS 1660:2024 हे भारतीय मानक तातडीने लागू करण्यात आले आहे.
अॅल्युमिनियमच्या पेयांच्या डब्यांसाठी IS 14407:2023 हे मानक लागू होणार आहे. मोठ्या व सामान्य उद्योगांसाठी त्याची अंमलबजावणी १ एप्रिल २०२७ पासून, लघुउद्योगांसाठी १ जुलै २०२७ पासून, तर सूक्ष्म उद्योगांसाठी १ ऑक्टोबर २०२७ पासून होणार आहे.
नवीन नियमांनुसार संबंधित उत्पादनांना आवश्यक गुणवत्ता मानकांची पूर्तता करून BIS प्रमाणन आणि मानक चिन्हाबाबतच्या अटींचे पालन करावे लागेल. नियमांचे उल्लंघन केल्यास भारतीय मानक ब्युरो कायद्यानुसार कारवाई होऊ शकते.

प्रतिनिधी उमेश कुलकर्णी


67
कृपया वोट करा

लोक1 न्यूजच्या बातम्याबद्दल मत व्यक्त करा

error: Content is protected !!