SIR विरोधी आंदोलनात अर्थमंत्र्यांच्या पतींची एन्ट्री; २३ ऑक्टोबरला देशव्यापी मोर्चा


SIR विरोधी आंदोलनात अर्थमंत्र्यांच्या पतींची एन्ट्री; २३ ऑक्टोबरला देशव्यापी मोर्चा

नवी दिल्ली : केंद्रीय अर्थमंत्री निर्मला सीतारामन यांचे पती आणि अर्थतज्ज्ञ पराकला प्रभाकर हे २३ ऑक्टोबर रोजी होणाऱ्या SIR विरोधी आंदोलनात सहभागी होणार आहेत. ‘पीपल अगेंस्ट SIR’ या संघटनेच्या वतीने मतदार याद्यांच्या विशेष सखोल पुनरीक्षण प्रक्रियेविरोधात हे आंदोलन आयोजित करण्यात आले आहे.
या आंदोलनात अभिनेते प्रकाश राज, अभिजीत दिपके, ज्येष्ठ वकील प्रशांत भूषण, किसान नेते राकेश टिकैत आणि नेहा बोरा यांच्यासह विविध क्षेत्रांतील व्यक्ती सहभागी होण्याची अपेक्षा आहे.
SIR प्रक्रिया रद्द करावी, मुख्य निवडणूक आयुक्त ज्ञानेश कुमार यांनी राजीनामा द्यावा आणि मतदार यादीतून वगळलेल्या पात्र मतदारांची नावे पुन्हा समाविष्ट करावीत, अशा प्रमुख मागण्या आंदोलनकर्त्यांनी केल्या आहेत.

प्रतिनिधी उमेश कुलकर्णी


67
कृपया वोट करा

लोक1 न्यूजच्या बातम्याबद्दल मत व्यक्त करा

error: Content is protected !!