महाराष्ट्राला मिळणार पहिली वंदे भारत स्लीपर ट्रेन?
मुंबई-बंगळुरू प्रवास होणार अधिक वेगवान; पुणे आणि सोलापूरलाही फायदा!
महाराष्ट्रातील पहिल्या ‘वंदे भारत स्लीपर’ ट्रेनचे १ नोव्हेंबर रोजी उद्घाटन प्रस्तावित असल्याची माहिती समोर आली आहे. मुंबई-बंगळुरू मार्गावर धावणाऱ्या या १६ डब्यांच्या ट्रेनमुळे १,११८ किलोमीटरचे अंतर सुमारे १६ तासांत पूर्ण होण्याची शक्यता आहे. ही ट्रेन पुणे आणि सोलापूरमार्गे धावणार असल्याने प्रवाशांना मोठा दिलासा मिळण्याची अपेक्षा आहे.
प्रतिनिधी उमेश कुलकर्णी
Views: 45






