काळेवाडीत वृद्ध महिलेचा पाय PVC पाईपमध्ये अडकला; २ तासांच्या थरारानंतर अग्निशमन दलाने सुखरूप बाहेर काढले!


​काळेवाडीत वृद्ध महिलेचा पाय PVC पाईपमध्ये अडकला; २ तासांच्या थरारानंतर अग्निशमन दलाने सुखरूप बाहेर काढले!

​पिंपरी चिंचवडमधील काळेवाडी परिसरात एक खळबळजनक घटना घडली असून येथे पाणीपुरवठा राखीव पीव्हीसी पाईपमध्ये एका वृद्ध महिलेचा पाय अडकला होता. या घटनेमुळे परिसरात मोठी गर्दी जमली होती.
​मिळालेल्या माहितीनुसार, सदर महिला चालत असताना अचानक तिचा पाय या पाईपमध्ये अडकला. पाय काढण्याचे सर्व प्रयत्न अपयशी ठरल्यानंतर स्थानिक नागरिकांनी तातडीने अग्निशमन दलाला पाचारण केले.
​अग्निशमन दलाच्या जवानांनी घटनास्थळी धाव घेत अत्यंत कौशल्याने आणि खबरदारीने काम सुरू केले. सुमारे २ तास चाललेल्या या थरारक बचाव कार्यानंतर, पाईपला इजा न पोहोचवता महिलेचा पाय सुखरूप बाहेर काढण्यात जवानांना यश आले. सुरक्षितरीत्या बाहेर काढल्यानंतर महिलेने आणि त्यांच्या नातेवाईकांनी सुटकेचा नि:श्वास सोडला.
​अग्निशमन दलाच्या या तत्परतेचे सर्व स्तरांतून कौतुक होत आहे.

पत्रकार उमेश कुलकर्णी
9822545429


26
कृपया वोट करा

लोक1 न्यूजच्या बातम्याबद्दल मत व्यक्त करा

error: Content is protected !!