मुख्यमंत्र्यांसह सर्व मंत्र्यांच्या ताफ्यातील गाड्या कमी करणार; देवेंद्र फडणवीसांचा मोठा निर्णय
मुंबई : पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या काटकसरीच्या आवाहनाला त्वरित प्रतिसाद देत महाराष्ट्राचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी मंत्रिमंडळासाठी कठोर निर्बंध जाहीर केले आहेत. प्रशासकीय खर्चावर नियंत्रण मिळवण्यासाठी आणि इंधनाची बचत करण्यासाठी हा ऐतिहासिक निर्णय घेण्यात आला आहे.
प्रमुख निर्णयांमध्ये मुख्यमंत्र्यांसह सर्व मंत्र्यांच्या ताफ्यातील वाहनांची संख्या निश्चित कपात करण्यात आली आहे. याशिवाय, अधिकारी आणि मंत्र्यांच्या परदेश दौऱ्यांवरही कडक मर्यादा घालण्यात आल्या आहेत. इंधनाचा वापर अत्यंत काटकसरीने करण्यावर विशेष भर देण्यात आला असून, यामुळे राज्याच्या अर्थव्यवस्थेला मोठा फायदा होईल, असे फडणवीस यांनी सांगितले.
या निर्णयाची अंमलबजावणी तात्काळ सुरू होईल. विरोधकांनी या पावलाचे स्वागत करावे आणि याची थट्टा करू नये, असे आवाहनही मुख्यमंत्र्यांनी केले आहे. हा निर्णय केंद्र सरकारच्या ‘मिनिमम गव्हर्नमेंट, मॅक्सिमम गव्हर्नन्स’ धोरणाशी सुसंगत आहे.
पत्रकार उमेश कुलकर्णी
9822548429










