पोलीस भरतीची लेखी परीक्षा पुन्हा होणार; २४ मे रोजी नव्याने परीक्षा


पोलीस भरतीची लेखी परीक्षा पुन्हा होणार; २४ मे रोजी नव्याने परीक्षा

राज्यातील पोलीस शिपाई भरती प्रक्रियेत घेण्यात आलेली लेखी परीक्षा रद्द करण्यात आली असून आता २४ मे २०२६ रोजी नव्याने परीक्षा घेतली जाणार आहे. या निर्णयामुळे परीक्षा देणाऱ्या हजारो उमेदवारांना मोठा दिलासा मिळाला आहे.
२ मे रोजी झालेल्या लेखी परीक्षेमध्ये १०० पैकी तब्बल ५८ प्रश्न खासगी प्रकाशकांच्या पुस्तकांतील प्रश्नांसारखेच आढळल्याचा आरोप झाला होता. या प्रकारानंतर परीक्षेच्या पारदर्शकतेवर प्रश्नचिन्ह निर्माण झाले होते. प्रकरणाची गंभीर दखल घेत प्रशासनाने चौकशी सुरू केली होती.
या पार्श्वभूमीवर अपर पोलीस महासंचालकांनी संबंधित परीक्षा रद्द करण्याचा निर्णय घेतला. आता नव्याने परीक्षा घेऊन भरती प्रक्रिया पारदर्शक आणि निष्पक्ष पद्धतीने पूर्ण करण्याचा प्रशासनाचा प्रयत्न आहे.
दरम्यान, उमेदवारांनी नव्या परीक्षेच्या तारखेची तयारी सुरू केली असून, यावेळी पारदर्शक पद्धतीने परीक्षा पार पडेल अशी अपेक्षा व्यक्त केली जात आहे.
पत्रकार उमेश कुलकर्णी 9822548429


26
कृपया वोट करा

लोक1 न्यूजच्या बातम्याबद्दल मत व्यक्त करा

हे देखील पहा...

error: Content is protected !!