गेट वे ऑफ इंडियाजवळील बेस्ट बसस्थानक स्थलांतराचा प्रस्ताव फेटाळला


गेट वे ऑफ इंडियाजवळील बेस्ट बसस्थानक स्थलांतराचा प्रस्ताव फेटाळला

मुंबईतील गेट वे ऑफ इंडिया परिसरातील बेस्ट बसस्थानक छत्रपती शिवाजी महाराज वस्तुसंग्रहालयासमोर हलवण्याचा प्रस्ताव बेस्ट समितीने फेटाळून लावला आहे. विधानसभा अध्यक्ष राहुल नार्वेकर यांच्या सूचनेनुसार हा मार्ग बदलण्याचा प्रस्ताव मांडण्यात आला होता.
मात्र, समिती सदस्यांनी या प्रस्तावाला जोरदार विरोध दर्शवला. हा निर्णय खासगी वाहनांना प्राधान्य देणारा असून सामान्य प्रवाशांच्या हिताला धक्का पोहोचवणारा असल्याचे मत अनेक सदस्यांनी व्यक्त केले. त्यामुळे अखेर हा प्रस्ताव नामंजूर करण्यात आला.
गेट वे ऑफ इंडिया परिसरात दररोज हजारो प्रवासी आणि पर्यटकांची वर्दळ असते. अशा परिस्थितीत बसस्थानक स्थलांतरित केल्यास प्रवाशांना अतिरिक्त गैरसोयीचा सामना करावा लागला असता, अशीही चर्चा बैठकीत झाली.
पत्रकार उमेश कुलकर्णी 9822548429


26
कृपया वोट करा

लोक1 न्यूजच्या बातम्याबद्दल मत व्यक्त करा

हे देखील पहा...

error: Content is protected !!