तामिळनाडूच्या राजकारणात खळबळ; राष्ट्रपती राजवटीच्या मागणीसह सुप्रीम कोर्टात याचिका दाखल


​तामिळनाडूच्या राजकारणात खळबळ: राष्ट्रपती राजवटीची मागणी करत सुप्रीम कोर्टात याचिका दाखल -​

चेन्नईतामिळनाडूच्या राजकारणात सध्या मोठी खळबळ उडाली असून राज्य सरकार अडचणीत येण्याची शक्यता निर्माण झाली आहे. तामिळनाडू विधानसभा निवडणुकीदरम्यान झालेला कथित घोडेबाजार आणि भ्रष्टाचाराच्या प्रकरणाची सीबीआय (CBI) चौकशी करण्याची मागणी करणारी याचिका थेट सर्वोच्च न्यायालयात दाखल करण्यात आली आहे.
​या याचिकेमध्ये राज्यातील सध्याची राजकीय परिस्थिती पाहता राष्ट्रपती राजवट लागू करण्याची मागणी करण्यात आल्याने राजकीय वर्तुळात उलटसुलट चर्चा सुरू झाल्या आहेत. टीव्हीके (TVK) सरकारविरोधात ही याचिका दाखल करण्यात आल्याचे समजते.
​याचिकेतील मुख्य मुद्दे:
​विधानसभा निवडणुकीतील कथित भ्रष्टाचार आणि आर्थिक गैरव्यवहारांची चौकशी व्हावी.
​संपूर्ण प्रकरणाचा तपास सीबीआयकडे सोपवण्यात यावा.
​राज्यातील कायदा आणि सुव्यवस्थेच्या मुद्द्यावरून राष्ट्रपती राजवटीची मागणी.
​सर्वोच्च न्यायालय आता या याचिकेवर काय निर्णय घेणार आणि तामिळनाडू सरकार याला काय प्रत्युत्तर देणार, याकडे संपूर्ण देशाचे लक्ष लागले आहे.

पत्रकार उमेश कुलकर्णी
9822548429


26
कृपया वोट करा

लोक1 न्यूजच्या बातम्याबद्दल मत व्यक्त करा

हे देखील पहा...

error: Content is protected !!