इन्स्टाग्रामवरून गावठी पिस्तुलांची विक्री; पुणे गुन्हे शाखेची मोठी कारवाई, सराईत गुन्हेगार लातूरमधून अटकेत


इन्स्टाग्रामवरून गावठी पिस्तुलांची विक्री; पुणे गुन्हे शाखेची मोठी कारवाई, सराईत गुन्हेगार लातूरमधून अटकेत

पुणे : सोशल मीडियाच्या माध्यमातून बेकायदेशीर शस्त्रांची खरेदी-विक्री करणाऱ्या एका सराईत गुन्हेगाराला पुणे गुन्हे शाखेने लातूर येथून अटक केली आहे. शेख अहमद उर्फ बबलू सूरज सय्यद असे अटक करण्यात आलेल्या आरोपीचे नाव आहे.
मिळालेल्या माहितीनुसार, आरोपी बबलू हा इन्स्टाग्रामवर गावठी पिस्तुले हातात घेऊन फोटो आणि व्हिडिओ पोस्ट करत होता. या माध्यमातून तो ग्राहकांना आकर्षित करून बेकायदेशीर शस्त्रांची विक्री करत असल्याचे तपासात उघड झाले आहे.
बबलू हा मूळचा पुण्यातील बिबवेवाडी परिसरातील रहिवासी असून, त्याच्याविरुद्ध पर्वती, खडक आणि वाघोली पोलीस ठाण्यांमध्ये विविध गंभीर गुन्हे दाखल आहेत. तो अनेक दिवसांपासून पोलिसांना हवा होता.
पोलीस तपासात असेही समोर आले आहे की, आरोपी मध्य प्रदेशातील शस्त्र तस्करांकडून गावठी कट्टे आणि पिस्तुले मागवून घेत होता. त्यानंतर महाराष्ट्रातील विविध भागांमध्ये ही शस्त्रे चढ्या दराने विक्री केली जात होती.
पुणे गुन्हे शाखेच्या पथकाने गुप्त माहितीच्या आधारे लातूर येथे सापळा रचून त्याला अटक केली. या कारवाईत पोलिसांनी आरोपीकडून ५ गावठी पिस्तुले आणि ७ जिवंत काडतुसे जप्त केली आहेत.
या आंतरराज्य शस्त्र तस्करी रॅकेटमध्ये आणखी कोणाचा सहभाग आहे, याचा सखोल तपास पुणे पोलीस करत असून, या प्रकरणातून आणखी धक्कादायक माहिती समोर येण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे.

पत्रकार उमेश कुलकर्णी
9822848429


26
कृपया वोट करा

लोक1 न्यूजच्या बातम्याबद्दल मत व्यक्त करा

हे देखील पहा...

error: Content is protected !!