अंतरवाली सराटी — मराठा आरक्षणाच्या मुद्यावरून मनोज जरांगे पाटील पुन्हा एकदा आक्रमक होताना दिसत आहेत. त्यांनी आरक्षणाच्या मागण्या ऐकून देण्यासाठी उद्यापासून (30 मे) उपोषण सुरू करण्याची निर्णय घेतला आहे आणि हा निर्धार त्यांनी आज राज्याचे मंत्री राधाकृष्ण विखे पाटील व आमदार प्रसाद लाड यांच्या शिष्टमंडळासमोर स्पष्टपणे मांडला. “साहेब नाही जमणार, मी उपोषण करणारच,” असे जरांगे यांनी मंत्र्यांना सांगितले.
आजच्या बैठकीत झालेल्या दीर्घ चर्चेनंतरही कोणताच ठोस तोडगा निघाल्याने ही चर्चा निष्फळ ठरली. जरांगे पाटीलांनी सरकारकडे दोन प्रमुख मागण्या मांडल्या आहेत:
राज्यात सापडलेल्या ५८ लाख कुणबी नोंदींची अधिकृत यादी त्वरित जाहीर करावी.
हैदराबाद गॅझेटनुसार मराठवाड्यातील मराठ्यांना प्रमाणपत्र व त्याची वैधता देण्यात यावी.
उद्या (३० मे) पासून सुरू होणाऱ्या या उपोषणामुळे राज्य सरकारसमोर दबाव वाढण्याची शक्यता आहे. स्थानिक प्रशासन आणि पोलिस यांचे लक्ष इतर संभाव्य परिणामांवर आहे. आत्तापर्यंत सरकार किंवा संबंधित मंत्र्यांकडून औपचारिक प्रतिक्रिया मिळालेली नाही; त्यांच्या प्रतिक्रिया मिळताच बातमी अद्ययावत केली जाईल.
पत्रकार: उमेश कुलकर्णी
मोबाईल: 9822548429








