पुण्यात वाहतूक कोंडीवर ‘एआय’चा उपाय; ५०० स्मार्ट कॅमेरे बसवणार


पुण्यात वाहतूक कोंडीवर ‘एआय’चा उपाय; ५०० स्मार्ट कॅमेरे बसवणार

पुणे :पुणे शहरातील वाढत्या वाहतूक कोंडीवर नियंत्रण मिळवण्यासाठी पुणे वाहतूक पोलिसांनी अत्याधुनिक तंत्रज्ञानाचा आधार घेण्याचा निर्णय घेतला आहे. वाहतूक व्यवस्थापन अधिक प्रभावी करण्यासाठी शहरात लवकरच ५०० कृत्रिम बुद्धिमत्ता (एआय) आधारित कॅमेरे बसवण्यात येणार आहेत.
‘पुणे ट्रॅफिक परिषदेत’ अतिरिक्त पोलीस आयुक्त मनोज पाटील यांनी ही माहिती दिली. तंत्रज्ञान, तज्ज्ञांचा सल्ला आणि नागरिकांचा सहभाग या त्रिसूत्रीच्या माध्यमातून शहरातील वाहतूक व्यवस्था सुधारण्याचा प्रयत्न करण्यात येत असल्याचे त्यांनी सांगितले.
हे अत्याधुनिक एआय कॅमेरे वाहतूक नियमांचे उल्लंघन करणाऱ्या वाहनचालकांवर कोणत्याही मानवी हस्तक्षेपाशिवाय स्वयंचलितपणे कारवाई करतील. सिग्नल तोडणे, चुकीच्या मार्गाने वाहन चालवणे, हेल्मेट किंवा सीटबेल्ट नियमांचे उल्लंघन यांसारख्या प्रकारांवर नजर ठेवून थेट दंडात्मक कारवाई केली जाणार आहे. त्यामुळे वाहतूक शिस्त वाढण्यास मदत होणार असल्याचा विश्वास व्यक्त करण्यात आला.
याशिवाय, शहरातील वाहनांची वाढती संख्या आणि वाहतूक कोंडी कमी करण्यासाठी सार्वजनिक वाहतुकीला प्रोत्साहन देण्याच्या उद्देशाने लवकरच पुण्यात पुन्हा ‘बस डे’ साजरा करण्यात येणार आहे. नागरिकांनी खासगी वाहनांऐवजी बससेवेचा वापर करावा, यासाठी विविध जनजागृती उपक्रमही राबवले जाणार आहेत.
पुणे शहरातील वाहतुकीचे प्रमुख प्रश्न सोडवण्यासाठी तंत्रज्ञानाधारित उपाययोजना आणि नागरिकांच्या सहकार्यामुळे भविष्यात वाहतूक व्यवस्था अधिक सक्षम आणि शिस्तबद्ध होईल, अशी अपेक्षा व्यक्त करण्यात येत आहे.
पत्रकार उमेश कुलकर्णी
9822548429


26
कृपया वोट करा

लोक1 न्यूजच्या बातम्याबद्दल मत व्यक्त करा

हे देखील पहा...

error: Content is protected !!