​पुण्यात ५०० रुपयांच्या बनावट नोटा वटवणारे दोघे अटकेत; कोरेगाव पार्क पोलिसांची कारवाई


​पुण्यात ५०० रुपयांच्या बनावट नोटा वटवणारे दोघे अटकेत; कोरेगाव पार्क पोलिसांची कारवाई

​पुण्यातील ढोले पाटील रस्त्यावर ५०० रुपयांच्या बनावट नोटा बाजारात चालवण्याचा धक्कादायक प्रकार उघडकीस आला आहे. या प्रकरणी दुकानदारांच्या सतर्कतेमुळे दोन आरोपींना कोरेगाव पार्क पोलिसांनी रंगेहात अटक केली आहे.
​ओमप्रकाश अग्रवाल आणि मौसम मिश्रा अशी अटक करण्यात आलेल्या आरोपींची नावे आहेत.
​मिळालेल्या माहितीनुसार, शुक्रवारी (१९ जून) दुपारी सुमारे ३ वाजेच्या सुमारास ढोले पाटील रस्त्यावरील ‘मल्हार टी शॉप’ आणि ‘युनिक शॉप’मध्ये हे आरोपी गेले होते. तेथे त्यांनी बनावट नोटा देऊन सिगारेट खरेदी करण्याचा प्रयत्न केला. मात्र, नोटा बनावट असल्याचा संशय आल्याने दुकानदारांनी तात्काळ सतर्कता दाखवली आणि पोलिसांना याबाबत माहिती दिली.
​घटनेची माहिती मिळताच कोरेगाव पार्क पोलिसांनी तातडीने कारवाई करत दोन्ही आरोपींना ताब्यात घेतले. पोलिसांनी त्यांच्याकडून ५०० रुपयांच्या बनावट नोटा जप्त केल्या आहेत. या संदर्भात पोलीस पुढील तपास करत असून, या मागे मोठे रॅकेट आहे का किंवा या नोटा कोठून आणल्या गेल्या, याचा शोध घेतला जात आहे.

पत्रकार उमेश कुलकर्णी
9822548429


26
कृपया वोट करा

लोक1 न्यूजच्या बातम्याबद्दल मत व्यक्त करा

हे देखील पहा...

error: Content is protected !!